Ajay kandewar,Wani : काँग्रेसच्या झरीजामनी ब्लॉक अध्यक्षपदासाठी झालेल्या मुलाखतींमध्ये आशिष खुलसंगे यांचा पत्ता कट झाला आहे. निवड समितीने सरळसरळ त्यांना बाजूला सारत, धुरा संदिप उर्फ लक्ष्मण भाऊराव बुर्रेवार यांच्या हाती सोपवली.

आशिषचा प्रभाव समितीसमोर टिकला नाही. उलट, “काँग्रेस बळकट करणार” ही जबाबदारी आता संदिपकडे आली असून, पंधरा दिवसांत नवी कार्यकारिणी उभी करण्याचे आदेश जिल्हाध्यक्षांनी दिले आहेत.स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आता कुजबुज सुरू झाली आहे की, संदिप बुर्रेवार यांच्या निवडीमुळे झरीजामनी काँग्रेसमध्ये नवा उत्साह संचारला असून, आशिषसाठी मात्र ही धुरा ‘गमावलेली संधी’ ठरली आहे.
•झरि काँग्रेसमध्ये आशिष खुलसंगे यांचा पत्ता नेमका कट झाला?
•कार्यकर्त्यांपासून दुरावा …..?
आशिष यांची शैली प्रत्यक्ष संघटनकामात त्यांची पकड कमी असल्याचे आरोप ही होत होते अशीही खमंग चर्चा रंगू लागली.स्थानिक पातळीवर संघर्षाची वेळ आली असता आशिष फारसे पुढे दिसले नाहीत. त्यामुळे “फक्त चर्चेत राहणं आणि संघटन मजबूत करणं यात जमीन-अस्मानाचा फरक आहे” अशी नाराजी कार्यकर्त्यांमध्ये वाढली होती.
• जिल्हाध्यक्ष विश्वास कमी :
निवड समितीला हव्या त्या पातळीवर आशिष प्रभाव पाडू शकले नाहीत. उलट संदिप बुर्रेवार यांचे संघटनाशी असलेले नाते आणि त्यांचा सक्रीय सहभाग अधिक वजनदार ठरला.

