Ajay Kandewar,Wani:– प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत खेळ व कला संवर्धन मंडळ पंचायत समिती वणीद्वारा आयोजित नेरड केंद्रातील केंद्रस्तरीय क्रीडा सामने पठारपूर येथे आयोजित करण्यात आले होते.या स्पर्धेत 11 शाळेंचा सहभाग होता. तीन दिवसीय मुलांच्या अटीतटीच्या झालेल्या खेळांच्या विविध सामन्यांमध्ये पठारपुर शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटक म्हणून पोलीस स्टेशन मुकुटबनचे पोलीस निरीक्षक दिलीप वडगावकर हे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंचा निता टेमुर्डे व सत्कारमुर्ती म्हणून विवेक मांडवकर हे उपस्थित होते.प्रमुख पाहुणे शा.व्य.स अध्यक्ष जीवन पिंपळकर ,उपाध्यक्ष माधुरी गारघाटे,विजय पारखी ,सुशांत नवले,प्रविण लोडे,स्वाती क्षिरसागर,भारती मडावी, शिल्पा कुळमेथे, दिनेश मांडवकर,रत्त्नमाला झाडे ,अमोल काळे, प्रशांत जुमनाके, केंद्रप्रमुख नितेश बावणे,विनोद नासरे,विलास मांडवकर,पोलीस पाटील अमोल मांडवकर, तंटामुक्ती अध्यक्ष देवराव नांदेकर हे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुरेश बदखल यांनी केले तर सूत्रसंचालन रचना तेलगोटे व आभार प्रदर्शन विषय शिक्षक प्रकाश तालावार यांनी केले.
नेरड केंद्रात 11 शाळेनी शो-ड्रिलचे सादरीकरण केले. या शो-ड्रीलमध्ये प्रथम क्रमांक पठारपूर शाळेने पटकाविला. तसेच कबड्डी,लंगडी, खो-खो हे सांघिक आणि लांब उडी, उंच उडी, थाळीफेक, गोळा फेक, 100 मी, 200 मी, 400 मीटर धावणे 400 मीटर रिले अशा प्रकारचे अनेक वैयक्तिक सामने घेण्यात आले.या केंद्रात सर्वात जास्त वैयक्तिक व सांघिक सामनें जिंकून पठारपूर शाळेने “चॅम्पियन्स ट्रॉफीवर” कब्जा केला.या तीन दिवसीय केंद्रस्तरीय महोत्सवासाठी केंद्रातील समस्त शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक, महिलावर्ग तसेच विशेष युवावर्गाचे ही सहकार्य लाभले.”