अजय कंडेवार,Wani :- व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडले आहेत. त्या तुलनेत घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती कमी आहेत. यामुळे अनेक हॉटेल व्यावसायिक, वडापावच्या गाड्या आणि खानावळीमध्ये घरगुती गॅसचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. मात्र याकडे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत आहे
शहरात बहुतांश शहरातील व्यावसायिक आपल्या व्यावसायासाठी लागणारा गॅस कमर्शियल गॅस महाग असल्याने तो न वापरता घरगुती गॅस वापरत आहेत. तशा घरगुती वापराच्या हॉटेलच्यासमोर, हॉटेलमध्ये, व्यावसायिक गाढे यांच्यासमोर सर्रासपणे दिसून येतात. त्यामुळे याकडे संबंधित प्रशासनाचे मात्र स्पष्ट अर्थपुर्ण दुर्लक्ष होत आहे अशी बोंब आहे. कारण व्यावसायिक गॅसच्या तुलनेत घरगुती गॅस स्वस्त असल्याने मोठे तसेच छोटे व्यावसायिक घरगुती गॅसचाच वापर अवैधरीत्या करीत आहेत. चायनीज गाड्यांसह चौका-चौकातील खाद्यपदार्थ विक्री करणारे देखील घरगुती गॅसच वापरत आहेत. घरगुती गॅस सिलिंडर सध्या 850 रुपये तर व्यावसायिक गॅस सिलिंडर 1855 ,1877 रु. पेक्षा जास्त आहे.ज्या कुटुंबाकडे घरगुती गॅसचे कनेक्शन आहे, त्यांना वर्षाला १२ गॅस सिलिंडर मिळतात. प्रत्यक्षात वापर मात्र आठ ते नऊ सिलिंडरचाच होतोय. घरगुती गॅस महागल्याने अनेकांचा वापर कमी झाल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी सरकारकडून आलेले सिलिंडर व्यावसायिक वापरू लागलेत आणि लोकांसाठी घरगुती गॅसचा वापर अवैधरित्या इंधन म्हणून केला जात आहे. कोणत्याही प्रकारची माहिती नसलेले लोक अवैधरित्या हा जीवघेणा ठरत आहे.
•वणीत असा होतो गॅस सिलिंडरचा काळाबाजार…
” वितरक आणि डिलिव्हरी करणारे कर्मचारी हे स्त्रोत गॅसचा काळाबाजार करणारे आहेत. काहीजण थेट वितरकाशी संपर्क करून गॅस सिलिंडरच्या दरापेक्षा काहीं रुपये अधिक देऊन घरगुती गॅसचा काळाबाजार करतात. तर काही प्रकरणामध्ये एका कुटुंबात विविध सदस्यांच्या नावावर तीन-चार कनेक्शन असतात. असे ग्राहक आपल्या नावावरील गॅस सिलिंडर व्यावसायिकांना चढ्या भावाने विकतात. तर काही गॅस एजन्सीचे कर्मचारी परस्पर गॅस व्यावसायिकाना पुरवितात. याकडे अन्न पुरवठा विभागाने लक्ष देण्याची गरज आहे सद्यस्थितीत हा विभाग याबाबत मूंग गिळून असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.”
•वर्षाला मिळतात १२ सिलिंडर; वापर आठ ते 9 सिलिंडरचाच….
“हातावरील पोट असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी केंद्र सरकारने उज्वला गॅस योजना सुरु केली. आतापर्यंत राज्यातील ४५ लाखापेक्षा जास्त कुटुंबांनी या योजनेंतर्गत गॅस कनेक्शन घेतले आहे. या लाभार्थीना प्रत्येकी तिनशे रुपयांची सबसिडी मिळते, असे संबंधित विभागाचे म्हणणे आहे. मात्र, प्रत्यक्षात तेवढी सबसिडी मिळत नसल्याची ओरड लाभार्थी करीत आहेत. घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने त्याचा वापर कमी झाल्याचे बोलले जात आहे. गॅस कनेक्शनधारकाला वर्षाला १२ गॅस सिलिंडर मिळतात. परंतु, बहुतेक लाभार्थीना वर्षाला आठ ते नऊ सिलिंडर लागतात. उर्वरित सिलिंडरचा वापर अवैधरित्या इंधनासाठी होतोय. याबाबत शक्यता टाळता येत नाही.