Ajay Kandewar,Wani:- तालुक्यांतील राजूर कॉ येथे रेल्वे लाईनच्या खुल्या जागेतील विहिरीत एक मृतदेह ता.25 मार्च 2024 रोजी आढळून आला होता. गावकऱ्यांनी ती आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय ही व्यक्त केला होता .या प्रकरणी शेवटीं Dysp गणेश कींद्रे यांनी स्वतः जातीने लक्ष देऊन वर्षभरानंतर त्या क्लिष्ट गुन्ह्याची फाईल हातात घेताच याप्रकरणी संशियत तीघांना(11 फेब्रु 2025) रोजी चौकशीसाठी ताब्यात घेत त्यांना खाकीचा हिसका दाखवताच आरोपींनी खून केल्याची जूबानी कबुली दिली.
नामदेव पोच्चम शेनुरवारला (50) रा.राजूर असे मृतकाचे नाव आहे. नामदेव हा सोमवारी रात्री घराबाहेर पडले. मात्र, मंगळवारी ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. ते न सापडल्याने ते शोधा शोध सुरुच होता. मंगळवारी दुपारी रेल्वे लाईनच्या खुल्या जागेतील विहिरीत एक मृतदेह ता.25 मार्च 2024 रोजी आढळून आला.जेव्हा ते मृतदेह बाहेर काढले तेंव्हा डोक्याला जबर मार ही होता त्यामुळे त्यांच्या हत्येचा संश्य व्यक्त होत होता. परंतु अक्षरशः या प्रकरणातील काहीं पोलिसांनीच दिशा बनवून टाकली होती परंतु या क्लिष्ट प्रकरणाची फाईल जेंव्हा वर्षभरानंतर काढली तेव्हा कुटुंबीयांचा जुबानी बयांनावरून प्रकरण तपासात घेत संशयित सिध्दार्थ मारोती शेनुरवार(34), दिवाकर गाडेकर (28),3) पिंट्या ऊर्फ प्रविण वामन मेश्राम (39) सर्व राहणार राजुर कॉलरी ता. वणी जि. यवतमाळ आहे या सर्वांना पोलीसांनी विश्वासात घेत चौकशी केली असता,
पोलिस माहितीनुसार सिध्दार्थ मारोती शेनुरवार(34), याने अनैतिक संबंधाची कुरकुर होत असल्याने मित्रांना सोबत घेत मृतक नामदेव पोचम शेनुरवार याला संपविण्याचा कट रचून 25 मार्च 2024 नामदेवचा खून करुन मृतदेह विहीरीत फेकल्याची कबुली दिली. यावरून कलम 302,201,34 भा.द.वी प्रमाणे तिन्ही आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई SDPO गणेश किंद्रे,P.I.गोपाल उंबरकर यांचे मार्गदर्शनात सपोनी निलेश अपसुंदे , अविनाश बनकर,अमोल अन्नेरवार, शंकर चौधरी व रितेश भोयर यांनी केली.