Friday, July 24, 2026
HomeBreaking Newsनागोराव घनकसार "सरपंच" पदासाठी "अपात्र" घोषीत......!

नागोराव घनकसार “सरपंच” पदासाठी “अपात्र” घोषीत……!

•शासकीय जमिनीवर अतिक्रमण भोवले,गावात खळबळ

अजय कंडेवार,वणी:- शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून घराचे बांधकाम करीत शासनाची दिशाभूल करणे हे कायर सरपंच नागोराव मारोती घनकसार याला अंगलट आले आहे. याप्रकरणी सदस्य व सरपंच पदावर राहण्यास अपात्र ठरविणारा आदेश यवतमाळ अप्पर जिल्हाधिकारी यांनी दि.1 डिसेंबर रोजी देत सरपंच याला कागदोपत्री रट्टाच दिल्याचे समजते.असेच अनेक प्रकार तालुक्यात घडल्याने चांगलीच राजकीय व ग्रामपंचायतेत खळबळ माजली असून उपसरपंच यांचेकडे प्रभार सोपविण्यात येणार असल्याचीही चर्चा रंगू लागली.

“कायर ग्रामपंचायत “…….. एक टिपलेले छायाचित्र.

नागोराव थेट जनतेतून सरपंच निवडून आलेल्या या सरपंचाला अपात्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. नागोरावला निवडणुकीचा काळात शिवसेनेन उमेदवारी नाकारली असता अपक्ष उमेदवार म्हणून नाममात्र उभा राहिला.त्यात अपक्ष म्हणुन अनुसूचित जातीतून कायर ग्रामपंचायतमधून निवडूनही आले. त्यानंतर गावातीलच काही जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांनी विद्यमान सरपंच पदाकरीता चुकीचे कागदे लावले व ते त्यासाठी पात्र नाहीं म्हणत ” सरपंच हा शासकीय जागेवर अतिक्रमणधारक” असल्याचे पुराव्यानिशी तक्रार दाखल केली. दिर्घ मुदतीनंतर यवतमाळ अप्पर जिल्हाधिकारी यांनी नागोराव मारोती घनकसार यांचा सदस्य व सरपंच पदासाठी अपात्र असल्याचे आदेश झळकले. सरपंच अपात्र आदेश निघताच गावात खळबळ माजली .

सब अप्पर जिल्हाधिकारी पत्र जिल्हाधिकारी यांनी केलेल्या अधिकारानुसार हा अपात्रतेचा आदेश पारित करित करण्यात आले.महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५१ चे कलम (१४)(ज-३,) नुसार दाखल केलेला “विवाद अर्ज” मंजूर करण्यात आले.त्यात नागोराव मारोती घनकसार कायर ग्रामपंचायत सरपंच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४ व(ज-३) अनुसार मधील तरतुदीनुसार सदस्य व सरपंच ग्रामपंचायतमधून अपात्र घोषीत करण्यात आले.सदरचा प्रकरणातील अर्जदार यांच्याकडून ॲड.पी.एम्.अडकिने यांनी हा युक्तिवाद केला असुन  सदर प्रकरण निकाली लावला.

पुराव्यानिशी आणखी काही उघड करणार आहोत असे स्पष्ट सूचक विधान तक्रार करणारे अर्जदार यांनी “विदर्भ न्यूज “ला ही माहिती दिली.  सरपंचाने पदाचा गैरवापरही केल्याचा खळबळजनक आरोप  करण्यात आला आहे ते देखील सिद्ध पुराव्यासहित “विदर्भ न्यूज” पुढचा बातमीत करणार आहे.”

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page