Tuesday, February 17, 2026
HomeBreaking Newsनगराध्यक्षपदासाठी ‘युवा नेतृत्वाची’ जोरदार पसंती...

नगराध्यक्षपदासाठी ‘युवा नेतृत्वाची’ जोरदार पसंती…

•कु.पायल तोडसाम ठरतायत शहराची विशेष दावेदार.

Ajay Kandewar, Wani :- नगरपरिषद निवडणुकीत वणी शहरात एक तगडा युवा नेतृत्वाचा चेहरा पुढे येत असून, नगराध्यक्ष पदाच्या ‘पसंतसूचीत’ कुमारी पायल तोडसाम यांचे नाव सध्या सर्वाधिक गाजत आहे. सुशिक्षित पार्श्वभूमी, सामाजिक अनुभवाची भक्कम जोड आणि शहरातील परिस्थितीची बारकाईने जाण- या तिन्ही गुणांनी समृद्ध असलेलं हे व्यक्तिमत्त्व वणीच्या राजकारणात नवीन अध्याय लिहिण्यास सिद्ध झालं असल्याची चर्चा शहरभर सुरू आहे.

शिवसेना (शिंदे गट) चे जिल्हा संघटक विजय चोरडिया  यांच्या नेतृत्वाखाली वणीतील शिवसेना प्रचाराने मोठी मुसंडी मारली असून, प्रत्येक प्रभागातील सभा, बैठका आणि डोअर-टू-डोअर संपर्क मोहिमा उत्साहात पार पडत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात होत असलेल्या बदलांची चाहूल घेत नागरिकांनीही या युवा नेतृत्वाला नगराध्यक्ष पदासाठी योग्य स्थान देण्याची तयारी दाखवली आहे. जनसंपर्कांच्या माध्यमातून पायल तोडसाम यांच्या नावाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता शहरातील मतदारांमध्ये एकच चर्चा यावेळी नगराध्यक्षपदी युवा,सुशिक्षित आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व हवे.

कु.पायल तोडसाम यांच्या उमेदवारीबाबत शहरात निर्माण झालेलं सकारात्मक वातावरण, महिलांचा प्रतिसाद, तरुणांचा उत्साह आणि सर्वसामान्य नागरिकांचा पाठिंबा या सर्वांमुळे त्या नगराध्यक्ष पदाच्या विशेष दावेदार म्हणून पुढे आल्याचे स्पष्ट संकेत राजकीय पटलावर दिसत आहेत.वणी नगरपरिषद निवडणुकीत ही युवा लाट शहराच्या राजकारणाला नवे दिशा देणार का, हे येणाऱ्या काळात निश्चित होईल; मात्र पायल तोडसाम यांचे नाव पसंतिसूचीत ठामपणे झळकत असल्याचं चित्र मात्र अधोरेखित होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments