•मारेगाव न्यायालयाचा निकाल
नागेश रायपूरे, मारेगाव:- येथील रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पत संस्था मर्या वणी शाखा मारेगाव कडुन कर्जाची उचल करुन कर्जाची परतफेड न करता धनादेश देवुन तो अनादर झाल्याने प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले.या प्रकरणी मारेगाव न्यायालयाने एका इसमास आठ महिन्याच्या कारावासाची शिक्षा व 1,50,000/-रुपयांचा नुकसान भरपाई चा आदेश देण्यात आला आहे.
दशरथ बापुण्या पवार रा.बोदाड असे शिक्षा झालेल्या कर्जदाराचे नाव आहे.त्याने श्री.रंगनाथ स्वामी नागरी सह. पत संस्था शाखा मारेगाव कडुन कर्जाची उचल केली होती.परंतु या करदाराने कर्जाची रक्कम न देता पतसंस्थेला धनादेश दिला.मात्र खात्यात रक्कम नसल्याने अनादर झाला.
त्यामुळे पत संस्थेचे कर्मचारी आनंद गंगशेट्टीवार यांनी न्यायालयात धाव घेत प्रकरण न्यायप्रविष्ट केले.सदर प्रकरणी येथील न्याय दंडाधिकारी निलेश वासाडे यांनी युक्तिवाद ऐकून आरोपी दशरथ पवार यास धनादेश अनादर प्रकरणी दोषी ठरवुन आठ महिन्याच्या कारावासाची शिक्षा व 1,50,000/-रुपये नुकसान भरपाई रक्कम पतसंस्थेला अदा करण्याचे आदेश दिले आहे.या प्रकरणी फिर्यादी च्या वतीने न्यायालयात ऍड. अमोल गौरकार यांनी बाजु मांडली होती.