Tuesday, February 17, 2026
HomeBreaking Newsधक्कादायक...ग्रामपंचायत चिखलगावचा "मापात पाप......."

धक्कादायक…ग्रामपंचायत चिखलगावचा “मापात पाप…….”

Ajay Kandewar,Wani:- चिखलगाव ग्रामपंचायतीच्या 2023 ते 2025 या कालावधीत झालेल्या रस्ते व नाली कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा खळबळजनक आरोप समोर आला आहे. गावातील युवकांनी थेट ग्रामपंचायतीच्या कारभारावर बोट ठेवत, अंदाजपत्रक आणि मापदंडांना हरताळ फासल्याचा गंभीर दावा केला आहे. कागदावर विकास दाखवायचा आणि प्रत्यक्षात निकृष्ट, अपूर्ण कामे करून निधी लाटायचा हा प्रकार चिखलगाव ग्रामपंचायतीत उघडकीस येत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप पसरला आहे.

तक्रारीनुसार, काम सुरू करण्यापूर्वी करावयाचे खोदकाम व लेवलींगच व्यवस्थित करण्यात आलेले नाही. 80mm सोलींग व प्रेसींग टाकलेले नाही, १:४:८ पि.सी.सी. बेड न करता थातूरमातूर कामे उरकण्यात आली. व्हेरींग कोटची जाडी अंदाजपत्रकाच्या मानाने कमी असून, एकूणच निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले आहे. परिणामी, नाल्यांची खोली व रचना दोषपूर्ण राहिली असून काही ठिकाणी कामे अर्धवट सोडून देण्यात आली आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे, काम पूर्ण झाल्याचा दाखला दिला असतानाही डि.एल.पी. कालावधी पूर्ण होण्याआधीच रस्त्यांना तडे जाऊन खड्डे पडले आहेत. यावरून प्रत्यक्ष काम आणि कागदोपत्री दाखवलेले मोजमाप यामध्ये प्रचंड तफावत असल्याचे स्पष्ट होते. ‘मापात पाप’ हा प्रकार इथे केवळ म्हण म्हणून नाही, तर वास्तव बनून समोर आला आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून उमटत आहे.

या सगळ्या प्रकरणात आणखी गंभीर मुद्दा म्हणजे कामासाठी वापरण्यात आलेली रेती तहसील कार्यालयाने जप्त केलेली असून ती बिनपरवाना (रॉयल्टी न भरता) वाहतूक करून वापरण्यात आली असल्याचा आरोप आहे. तरीही एम.बी. मध्ये रेतीचे शुल्क वजा करण्यात आलेले नाही. हा सारा गोंधळ सरपंच पतीच्या थेट हस्तक्षेपामुळे झाल्याची जोरदार चर्चा असून, सरपंच ,उपसरपंच व सचिव यांच्या भोंगळ कारभारामुळे चिखलगाव ग्रामपंचायतीचा चेहरा उघडा पडला आहे. आता या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments