• इंदिराग्राम येथील घटना
•आत्महत्येच्या घटना थांबता थांबेना…..
नागेश रायपूरे( मारेगाव) :– तालुक्यात आत्महत्येच्या घटना थांबता थांबत नसुन दिवसेंदिवस वाढतच जात आहे. आज 8 सप्टेंबर रोजी पुन्हा एका महिला शेकऱ्यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील इंदिराग्राम येथे सकाळी 8 वाजताचे दरम्यान उघडकीस आली.
मीराबाई राजू आत्राम (29 )असे आत्महत्या करणाऱ्या शेतकरी महिलेचे नाव आहे.प्राप्त माहिती नुसार मृतक महिलेकडे वडिलोपार्जित चार एकर शेतीजमीन असुन सततची नापिकीमुळे व कर्ज बाजारीपणा मुळे यावर्षी शेती ठेक्याने दिल्याचे बोलल्या जाते.मृतकाचे मागे पती एक मुलगा व मुलगी असुन आत्महत्याचे कारण कळू शकले नाही.मात्र होत असलेल्या सततच्या आत्महत्येच्या घटनेमुळे अवघा तालुका हादरला आहे.