•जिल्हा उपाध्यक्ष शेख इजहार यांचा हस्ते उद्घाटन संपन्न
अजय कंडेवार,वणी:- तालुक्यातील घोन्सा येथे स्व.राहुल वाटेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ C.T.P.S ,घोन्सा यांच्या संयुक्त विद्यमाने व्हॉलीबॉलचे डायरेक्ट रट्टा खुले दोन दिवसीय सामन्यांचे उद्घाटन काल दिनांक दि. २८ जानेवारी २०२३ रोज शनिवार आदर्श हायस्कुलचा भव्य पटांगणावर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शेख इजहार यांचा शुभ हस्ते थाटात संपन्न झाले.
क्रिकेट, बॅडमिंटन, फुटबॉल, टेनिस, आदी खेळ सर्वसामान्यांना परवडण्यासारखे नाहीत. त्यात ग्रामीण भागातील खेळाडूंना नाहीच नाही. त्यामुळेच गुणवत्ता असूनही केवळ पैसा नसल्याने ग्रामीण भागातील खेळाडू मागे राहतात. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना परवडेल असा खेळ खेळण्यास भाग पाडणे आवश्यक आहे. केवळ २५ गुणांकरिता नव्हे, तर या खेळातून त्यांच्या नोकरीचा प्रश्नही मार्गी लागायला हवा. अशा या खेळाडूंना परवडणारा व्हॉलीबॉल हा खेळ आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे.या स्पर्धेसाठी घोंसा येथे प्रथम पुरस्कार रु.३१०००/- नगदी रामटेके (माजी मुख्याध्यापक),द्वितीय पुरस्कार रु.२१०००/- नगदी प्रभाकर वाटेच्या स्मृतीप्रित्यर्थ निवेश सुरेश यांचे आरोग्य व स्वच्छता सभापती नगर पंचायत,तृतीय पुरस्कार रु.१५०००/- नगदी न्यु सितारा बार अँड रेस्टॉरंट, पोन्सा प्रो. नरेश ताडपल्लीवार यांचे तर्फे चतुर्थ पुरस्कार रु.११०००/- नगदी स्व. निळकंठ पा. चेडे व माधव पा. चेडे यांचे स्मृतीप्रित्यर्थ चि. परान भिमराव बेडे चि. सुरज संजय चेडे यांचे तर्फे ,पाचवा पुरस्कार रु.७०००/- नगदी पंकज नेमनवार उपसरपंच गोपालपुर यांचे तर्फे सहावा पुरस्कार रु.५०००/- नगदी स्व. होनुजी पा. बोटे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हंसराज होनुजी बोटे मुख्याध्यापक आश्रम शाळा जुनोनी यांचेकडुन देण्यात येणार आहे. यात अनेक अश्या बक्षिसांचा वर्षाव या स्पर्धेत होणार आहे.
या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष : जयसिंग गोहोकार, (कार्यकारी अध्यक्ष, वणी), कार्यक्रमाचे उद्घाटक इजहारशेख (जिल्हा उपाध्यक्ष कॉ. कमेटी),अध्यक्ष नगर परिषद कर्मचारी संघटना प्रमुख अतिथी पुरुषोत्तम आवारी, (माजी उपसभापती, कृ.उ.बा.स. वणी) प्रमोद वासेकर (संचालक-वसंत जिनींग वणी) ,दिनेश सुरेशलाल जयस्वाल (आरोग्य व स्वच्छता सभापती नगर पंचायत झरी जा.) मंगेश पा. मोहुर्ले (सरपंच ग्राम पंचायत घोन्सा) , विजय जिवणे (उपसरपंच ग्राम पंचायत ,घोन्सा ) यशवंत रामटेके (माजी मुख्याध्यापक) ,महेश उराडे (माजी पंचायत समिती सदस्य) ,गौरकार (मुख्याध्यापक आदर्श हायस्कुल घोन्सा ),भिमराव चेडे (सामाजिक कार्यकर्ता) जानराव ढोकणे या सर्वाची उपस्थिती होती.