•नवीन सार्वजनिक शौचालय बनलेच पाहिजे अशी मागणी.
•अन्यथा… स्थानिक स्वराज्य निवडणुकीवर बहिष्कार असा प्रभाग क्र.6 च्या नागरिकांचा तीव्र इशारा.
अजय कंडेवार,वणी:- शहरातील दामले फैल(प्रभाग क्र.6) येथील सार्वजनिक शौचालय अनेक वर्षभरापासून बंद अवस्थेत (जीर्ण अवस्थेत) आहे याकडे कुणीही लक्ष देत नसल्याने येथील स्थानिक महिलांची कुचंबणा होत असल्याने किशोर मंथनवार व रवि कोमलवार यांच्या नेतृत्वात दामले फैलातील अनेक महिलेनी नगरपरिषदेचा दालनात जाऊन संताप व्यक्त करीत सार्वजनिक शौचालयाचे नवीन बांधकाम करावे अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत दामले फैलातील नागरिकांतर्फे बहिष्कार टाकण्यात येईल असा संतापजनक इशारा देत नगरपरिषद मुख्यधिकारी व आरोग्य निरीक्षक यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.The women of Damle Fail strike on the municipal council.Demand that public toilet should be new.Otherwise… Citizens of Ward No. 6 strongly warn to boycott local self-government elections.
हागणदारी मुक्त संकल्पना वाऱ्यावर असल्याचेही चित्र दामले फैलात दिसून येत आहे. शौचालयाच्या समस्यांनी त्रस्त असून (प्रभाग क्र .6) मधील शौचालयाच्या रस्त्यावर प्रचंड घाणीचे साम्राज्य सरले आहे येथून चालणे देखील अशक्य असून रस्त्यावरच शौचालयाच्या पायऱ्यांवर वराह मृत्यूमुखी पडल्याने दुर्गंधी येत असल्यामुळे येथून जाणे देखील मुश्कील झाले आहे. यामुळे दामले फैल परिसरातील महिलांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत आहे. याबाबत प्रशासनाने दखल घेऊन सार्वजनिक शौचालय नवीन बांधकाम करून महिलांना होणारा नाहक त्रास थांबवावा अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत दामले फैलातील नागरिकांतर्फे बहिष्कार टाकण्यात येईल असा संतापजनक इशारा देण्यात आला.
यावेळी उपस्थित किशोर मंथनवार,रवि कोमलवार, प्रमोद मंथनवार, पूजा भलमे ,नंदा गोलर, नलू कुळसंगे,वंदना गोमासे, रजिमा झिड,शालु संगमवार,कीरण संगमवार,रेखा चौधरी ,संगीता गोर्ड ,कविता आरेबवार,अलका गुरनुले,खुशी वाढई,सुषमा दुर्गे ,निता बाबीलवार,दुर्गा भोयर,प्रिया मामीडवार,ज्योती प्रेमंकुटलावार,रवि बंडलवार, सोनु खंडारे,कमल कनकुंटलावार ,योगेश रायपुरे,ऋषी रायपुरे,वीक्की पोनुलकार,अक्षय भलमे, ,सागर जंगटे,शंकर कोमलवार, लक्ष्मण मामिडवार ,मनी नक्कावार ,अरविंद सोयाम ,विठ्ठल चौधरी ,दिलीप चौधरी, संदीप संगमवार, संतोष वाढई,संदीप वाढई व रतन दुर्गे आदि उपस्थित होते.