•शिक्षक, प्राध्यापक व बँक कर्मचारी यांना अल्टिमेटम
•मग, पोलीस कर्मचारीही हेल्मेट घालणार का ? जर ते घालणार नाही तर त्यावर कोणती कारवाई होणार याकडेही जनतेचे लक्ष.
•किती दिवस पोलिस बंधूंना चलान देणार याकडेही लक्ष? पण पोलीस हेल्मेट घालेलच का? हेही बघुया.
अजय कंडेवार,वणी:-दुचाकीस्वारांच्या वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन वाहतूक शाखा प्रमुख API सीता वाघमारे यांनी तालुक्यात दि.3 ऑगस्ट पासून विशेष हेल्मेट सक्ती मोहिम करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला अनुसरून शिक्षक, प्राध्यापक व बँककर्मचारी व साधारण व्यक्ती का असो ना. त्यांनी कर्तव्यावर येताना हेल्मेट घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. याशिवाय तालुक्यात ही हेल्मेटसक्ती राहणार असून हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. मग,मग, पोलीस कर्मचारीही हेल्मेट घालणार का ? जर ते घालणार नाही तर त्यावर कोणती कारवाई होणार याकडेही जनतेचे लक्ष लागले आहे.Brothers … wear a helmet in Wani Tahsil, otherwise…! Ultimatum to teachers, professors and bank employees.
हेल्मेट न घातल्यामुळे आतापर्यंत अनेक दुचाकीस्वारांचा अपघातात मृत्यू झाला आहे. हेल्मेट सक्तीच्या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी केली आहे. ही मोहीम संपूर्ण तालुक्यात अत्यंत कडकपणे राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या दुचाकीस्वारांवर तत्काळ दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले असून तालुक्यातील नागरिकांनी दुचाकी चालविताना हेल्मेट घालूनच प्रवास करावा. अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा वाहतूक शाखा प्रमुख API सीता वाघमारे यांनी दिला आहे.
“वाहतूक शाखा प्रमुख API सीता वाघमारे यांनी सर्वात आधी आपल्या(पोलीस प्रशासन) सर्व कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर येत असताना किंवा कर्तव्य बजावतांना हेल्मेटसक्ती केली का ? असाही सवाल जनतेतून करण्यात येत आहे.जर पोलिसच हेल्मेट घालणार नाही तर त्यावर कोणती कारवाई होणार याकडेही जनतेचे लक्ष लागले आहे. ही मोहीम किती दिवस सुरू राहील आणि किती आळा बसेल हे देखील पाहणे गरजेचे.”