Friday, October 23, 2026
HomeBreaking"त्या "ठाणेदाराला पोलिस दलाची अश्रुपूर्ण श्रद्धांजली....

“त्या “ठाणेदाराला पोलिस दलाची अश्रुपूर्ण श्रद्धांजली….

•SDPO कार्यालयात ठाणेदाराला अखेरची सलामी.

Ajay kandewar,Wani : “कर्तव्याच्या रेषेवर चालताना शेवटपर्यंत जनतेसाठी जगलेला अधिकारी” अशी ओळख निर्माण करणारा मारेगाव येथील ठाणेदार P.I उमेश बेसरकर यांच्या निधनाने संपूर्ण यवतमाळ पोलिस दल हळहळून गेले आहे.

आज (ता.23 ) रोजी सायंकाळी 6.30 वाजता वणी SDPO कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित श्रद्धांजली सभेत वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कनिष्ठ कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनीच त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. शिस्तबद्ध तुकडीने दिलेली सलामी आणि बिगुलाच्या स्वरांत दुमदुमलेला परिसर, वातावरणाला अधिकच भावनिक करून गेला.त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक गुन्ह्यांची उकल करून जनतेचा विश्वास संपादन केला. सलामी देताना नागरिक, सहकारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांच्या आठवणींना अश्रुपूर्ण निरोप दिला. त्यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी वर्षानुवर्षे भरून निघणं कठीण असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं.

•आपुलकीनं वागणारा होता हा  अधिकारी…….

नागरिकांसोबत मानवी नातं जपणारा आणि सहकाऱ्यांशी आपुलकीनं वागणारा अधिकारी म्हणून त्यांची प्रतिमा होती.“ते आमच्यासाठी फक्त अधिकारी नव्हते, तर मार्गदर्शक होते,” अशा शब्दांत सहकाऱ्यांनी त्यांचं स्मरण केलं.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page