Ajay Kandewar,वणी:- तालुक्यांतील राजूर येथील ऑटो चालकाचा हलगर्जीपणाने झालेल्या अपघातात सुस्साट चालत असलेल्या ऑटोतून पडून महिला मजुराचा जागीच मृत्यू दि.19 जानेवारी रोजी सायंकाळी 6.30 चा सुमारास हा अपघात झाला होता .या ऑटोने झालेला अपघातात रंजना प्रवेश जंगमवार असे मृत महिलेचे नाव होतें. या महिलेचा निघून जाण्याने अवघं कुटुंब उघड्यावर पडलं.याप्रकरणात जेव्हढा जबाबदार चालक आहे तेव्हढाच जबाबदार मालक आहे. कारण विना कागदपत्र, विना इन्शुरन्स कसा काय मालक हा चालकाला ऑटो देऊ शकतो. विशेष अनेकदा याचं ऑटोने अपघात झाल्यानंतरही अशी निष्काळजीपणा कसा करू शकतो हा ” हलगर्जी मालक”.
राजूर (कॉलरी) येथील रंजना प्रवेश जंगमवार (अंदाजे 45) या रहिवासी होत्या. ही लालपुलिया येथील संगीता कोलडेपो मध्ये मजुरी करायची.नेहमीप्रमाणे त्या कोलडेपोमध्ये रविवारी कामाला गेल्या होत्या. सायंकाळीं गावी परत जाण्यासाठी ऑटो क्र.MH-29-AM-0013 या गाडीत बसल्या. दरम्यान सोनामाता मंदिराजवळ सदर ऑटोचालक रहेमत रहेमान शेख(48) चें सुस्साट ऑटोवरील नियंत्रण सुटले. चालकाने निष्काळजीपणे ब्रेक दाबला.त्यामुळे ऑटोत बसलेल्या रंजना खाली पडले आणि डोक्याला जबर मार बसताच जागीच ठार झाल्याची माहिती मिळाली. त्यात आणखी काहीं रोजमजुरी करणारे काही महीला होत्या त्यांनाही जबर मार बसला होता.
•मुलं झालीत पोरकी…
“रंजना यांच्या पतीचे काही वर्षांआधी निधन झाले होते. त्यांना दोन मुलं व एका मुली आहेत. पतीच्या निधनाच्या धक्यातून सावरत त्यांनी मुलांचे पालनपोषन करण्याचा निर्णय घेतला. काबाडकष्ट, मजुरी करून त्या आपल्या मुलांचे शिक्षण पाणी करीत होते. त्यांचे तिन्ही मुलंमुली शिकत आहेत. आई हेच या तिघा अपत्यांचा आधार होती. मात्र आईच्या मृत्यूमुळे त्यांचे मुलं पोरके झाले असून त्यांचा आधार हरपला आहे.
•जीवघेणाऱ्या ऑटोचा मालकाने केली ही चुकी….
“18 मार्च रोजी पळसोनी फाट्यावर झालेल्या त्याचाच ऑटोचा अपघाताने 1 महिलेचा व 6 जखमी महिल्या झाल्या होत्या. त्यात कसा बसा राजूर गावकऱ्यांनी त्याला वाचविले. परंतु शेवटीं मालकाला का समजले नाही की, गाडीचे कागद नसलेला ऑटो चालकाला देऊ तरीही मालकाने निष्काळजीपणाचा कळस गाठत ऑटो रेहमत ला चालविण्यास दिला शेवटीं त्यानें आणखी एक अपघात केला त्यात एका आईचा शेवटीं अपघाती बळी घेतलाच आणि अख्खं कुटूंब उघडयावर आणलं. या अपघाताचं जेव्हढा चालक दोषी आहे. तेव्हढाच मालक ही दोषी आहे. त्यांचा हलगर्जीपणामूळे आजरोजी तीन मुले पोरकी झालीत. यावर पोलीस प्रशासनाने गांभिर्य लक्षात घेत कसून चौकशी केली पाहिजे . मालक एव्हढा हलगर्जी कसा असू शकेल. असे किती मालक हलगर्जी आहे याचा शोध गरजेचे आहे नाहीतर असे अनेक बळी जातं जाईल आणि कुटूंब उघडयावर पडत जाईल.”