Ajay Kandewar, Wani:- काँग्रेसचे वरिष्ठ नेते व वसंत शेतकरी जिंनिंग व प्रेसिंग फॅक्टरीचे माजी अध्यक्ष ऍड. देविदास काळे यांना कलम 39 नुसार ही कारवाई करुन संचालक पद रद्द करण्यात आले असे वसंत शेतकरी जिंनिंग व प्रेसिंग फॅक्टरीचे अध्यक्ष खुलसंगे यांनी 2 डिसेंबर रोजी सांगितले. परंतू यावर स्पष्ट खुलासा करीत त्यांनी म्हंटले की,या अध्यक्षांनी परस्पर नोटीस तयार करुन खोट्या सह्या घेत त्यावर आधारीत पद रिक्त केल्याची बोंब करीत आहे.हा एक राजकीय पेच आहे.यात काहीं तथ्य नाहीं कारण त्यांना तो कायदेशीर अधिकारच नाहीं.यातील सत्य येत्या काळात लेखी स्वरूपात उघड करण्याचा खंबीरपणे इशाराही ऍड. देविदास काळे यांनी दिला.
•पद रद्द करण्याचा अधिकार नेमका कुणाला असते आवर्जुन सामान्य जनतेने वाचाच…..
“Elective मेंबरचे पद रद्द करणे हा अध्यक्षाचे काम नाहीं तर तो अधिकार फक्त DDR (जिल्हा निंबधक) यांनाच अधिकार आहे.साधा “एक सभासद” याचे पद रद्द करायचे असेल त्या सभासदानें “गैरकृत्य” केलं म्हणून नोटीस द्यावा लागतं .त्याचबरोबर संचालक मंडळाचा ठराव देखील घ्यावा लागतो. नंतर “आमसभेचा सुद्धा” सरळ ठराव घ्यावा लागते. त्यात ती संस्था तालुकास्तरीय संस्था असेल तर TERH यांचा ठराव घ्यावा लागतो व जिल्हास्तरीय संस्था असेल तर DDR ची परवानगी घ्यावा घ्यावी लागते अशा प्रकारची ही एक मोठी प्रोसेस आहे. सर्व बाबी घेऊनच “एक साधा सदस्य”याला काढता येते हे तर ॲड.काळे हे तर इलेक्टिव्ह मेंबर आहे .मग या “एलेक्टिव मेंबरला “काढावयाची अनेक नियम आहेत. त्या नियमांमध्ये पद रद्द करण्याचा अधिकार विशेषता डीडीआरलाच आहे. हा जरी अध्यक्षाला तो अधिकार असेलच परंतु त्यावर शोकास नोटीस देणे आणि त्या मेंबरचे मत ऐकूण घेणे हे देखील महत्वाचे असते परंतु अशी एकही बाब वणी वसंत जिनिंगचे अध्यक्ष खुलसंगे यांनी केलें नाही . असा घणाघात काळे यांनी केला आहे.
•बनावट नोटीस तयार करून सह्या,हा राजकीय डाव….
“कोणतीही संस्था ही काही व्यक्तिगत नोटीस बजावत नाही तर एक जावक नोटीस असते .जावक नोटीस मध्ये एखादा कारण किंवा साधं नोटीस बजावायचेही असले तर ते जावक नोटीसवर सही महत्त्वाचे असते. एकतर सदस्य/संचालकाची नाहीतर कुंटूबातील एखाद्या जबाबदार सदस्याची असते.मग माझा परिवार मी पण बाहेर मग “ती “सही कोणाची❓ ती नोटीस निघलीच कशी? यावर अनेक प्रश्न निर्माण होत आहे. विशेषतः मागील 3 महिन्यांपासून ऍड.काळे हे आजाराने इस्पितळात ये-जा सूरू आहे. त्यामुळे हा प्रकार घडला यात तीळमात्र शंका नाहीं.आणि त्यातल्या त्यात कोणाचेही काहीं ऐकुन न घेता पद रद्द होते कसे ..? कदाचित अध्यक्षांनी कायद्याचे भान न ठेवता राजकीय सूढ भावनेतून हा प्रकार तर नाही केला असावा ? तसेच सतत 30 वर्ष वसंत जिनिंगचे अध्यक्ष असलेले ऍड काळे यांना संचालक पदावरून तडफडफी पद रद्द करणे ? असे अनेक प्रश्न कोडचं. परंतु यातून एक बाब नक्किच उघड होत आहे की अध्यक्ष हे “हुकूमशाहपणा “गाजवित तर नाही ना असाही जनतेतून या प्रकरणातून ऐकावयास मिळत आहे.