•मुकुटबन येथील घटना.
अजय कंडेवार,वणी :- शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत असतानाच आता आणखी एका शेतकऱ्याने विषाचा घोट घेतल्याची घटना झरी तालुक्यातील मुकुटबन येथे काल दि.2 सप्टें.ला सायंकाळीं घडली.
दिपक लक्ष्मण चेलपेलवार (40) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. मृतक दिपक याची मुकुटबन येथे शेतजमीन असुन तो शेती व्यवसाय करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. दि.31 जुलै रोजी गुरुवारी सायंकाळच्या सुमारास दिपकने विषारी औषध शेतात जाऊन प्राशन करून घरी आला आणि त्याची स्थिती बिकट झाली. त्याला तात्काळ वणी येथील एका खाजगी इस्पितळात उपचारकरीता नेण्यात आले तिथे त्याचावर उपचार देखील सूरू होतें परंतु 72 तासांनी दिपकची प्रकृती अत्यंत खालवली तर त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले.चंद्रपूर येथे नेत असतानाचा वाटेतच दिपकवर काळाचा घाला घातला त्यानंतर लगेच त्याला शासकिय रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले. ग्रामीण रुग्णालय येथे शवविश्चेदन करून मृतदेह नातेवाईकांना सोपविण्यात आले.दीपक ने आत्महत्या का केली ? याचे कारण अद्यापही कळू शकले नाही.त्याचा पाठीमागे पत्नी व दोन मुले असा आप्त परिवार आहे.