•वणी येथील घटना.
अजय कंडेवार,वणी:- शहरातील गुरूनगर परिसरात घरी वास्तव्यास असलेल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ता.१६ फेब्रु, शुक्रवार रोजी पहाटे उघडकीस आली.
विवेक बोंडे (२० वर्ष) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. विवेक हा मेंढोली येथील रहिवासी असून तो मारेगांव येथील एका कॉलेज मध्ये बि.एस.सी. द्वितीय वर्षाला शिक्षण घेत होता. तो बहिणी सोबत वणी येथील गूरूनगर येथे किरायाने राहत होता. गुरूवारी त्याची बहीण काही कामानिमित्त गावला गेली असता हो रूमवर एकटाच होता. त्याने पातळ बेडशिटच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली.विवेक यांनी आत्महत्या का केली ? अद्यापही कळले नाही.पुढील तपास वणी पोलिस करीत आहेत.