Ajay Kandewar,Wani:- गावात सध्या एकच खळबळ उडालेली आहे. तब्बल आठ सदस्यांनी तडकाफडकी राजीनामे दिल्यापासून उपसरपंचांची चांगलीच घाबरवंडी उडाल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.“असं नाही तसं सांगू नका” या भानगडीत उपसरपंच स्वतः काही सदस्यांच्या घरी भेटी देत असल्याची कुजबुज गावोगाव ऐकू येतेय. राजीनाम्याचा धक्का बसताच सत्ता हातातून जाण्याची भीती वाढली आणि त्यामुळेच ही धावपळ सुरू झाली, अशी थेट चर्चा नागरिकांमध्ये आहे.
विशेष म्हणजे, राजीनामा दिलेल्या आठ सदस्यांना आणखी तीन सदस्य अजूनही संपर्कात असल्याची उघड चर्चा असून, काही वेगळीच तयारी सुरू आहे असा आरोप थेट उपसरपंचांवर गावातून ऐकावयास येत आहे. “विकासासाठी राजीनामे दिले” असा दावा केला जात असला, तरी गावकऱ्यांचा सवाल मात्र बोचरा आहे – खरंच विकास कामांना अडथळा होता, काही विशेष राजीनामे दिले? “कुछ न** मि****इसलिये हमने दिया**” अशी ओरडही गावातून ऐकू येतेय.
एकीकडे उपसरपंचांवर त्या काहींचा भेटीगाठीचा बोजा, तर दुसरीकडे त्या आठ सदस्यांवरही संशयाची सुई फिरतेय. हा राजीनामा विकासासाठीचा लढा होता की पडद्यामागे वेगळीच खिचडी शिजतेय? हा प्रश्न आता गावाच्या चहापानापासून चौकातल्या चर्चेपर्यंत गाजतोय. सत्य काय ते लवकरच उघड होईल, पण सध्या तरी या राजीनाम्यांनी गावाचं राजकारण अक्षरशः तापवलं आहे.

