Ajay Kandewar,Wani:- सध्या तालुक्यातील पैनगंगा नदीपात्रातून व विदर्भा नदीपात्रातून नेरड, पुरड, कुंड्रा, चिलई, तेजापुर, आमलोन,शिंदोला व परमडोह येथील रेती तस्करांना सुगीचे दिवस आले असून बहुतेक नाल्यात रेती चोरांनी धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे, मागील दोन दिवसापासून “त्या तलाठ्यांचें क्रीडा सत्र” सूरू असल्याने ते खूप व्यस्त झाले आणि रेती चोरटयांना मोकळे रान करुन ठेवल्याचे चित्रं दिसत आहे.चोरट्यांनी रात्र ते पहाट होत पर्यंत ट्रीपा मारणे सूरू असून त्यांचे सुगीचे दिवस सूरू आहे.हे यातून दिसून येत आहे.तसेच मागील काही महिन्यांपासून एकाही रेती चोरट्यांवर कारवाई झाली नसल्याने त्यांना खुली सूट दिल्याचे दिसून येत आहे.
रेती तस्करांवर कारवाई करणारे पथक मात्र केवळ शोभेचे बाहुले बनले आहे. दरम्यान पैनगंगा नदीपात्रातून व विदर्भा नदीपात्रातून नेरड, पुरड, कुंड्रा, चिलई, तेजापुर, आमलोन, शिंदोला व परमडोह या गावातील चोरट्यांनी रेतीचा मोठ्या प्रमाणात साठा असल्याने शहरातील, ग्रामीण भागातील रेती चोरट्यांनी तिथे धुमाकूळ घातला आहे. रेती उपस्यासाठी पात्रात मोठमोठे खड्डे खोदण्यात येत असल्याने नाल्या काठावरच्या शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. वणी तालुक्यात मागील महिन्यात वरूणराजाने कृपा केली आहे. त्यामुळे लहानमोठे नाले पाण्याने तुडुंब भरले. आणि याच पाण्याच्या प्रवाहामुळे नाल्यासह काठावर रेतीचा मोठा साठा जमा झाला आहे. सध्या याच पात्रावर रेती तस्करांची मुजोरी पहायला मिळत आहे. त्यामुळे कारवाई अभावी महसूल जातो कुठे, असा प्रश्न निर्माण होत आहे.