•संध्याकाळपर्यंत भाविकांची अलोट गर्दी होण्याचे संकेत.
•यात्रेत दुकानांची रांगच-रांग.
•”स्पर्श काळजाचा”या नाटकाची तारीख पुढे ढकलली.
अजय कंडेवार,वणी:- तालुक्यातील कायर येथील तीर्थक्षेत्र भुडकेश्वर देवस्थान समितीच्या वतीने आज २७ नोव्हेंबरला दरवर्षी प्रमाणे पौर्णिमा यात्रोत्सवाचे आयोजन केले आहे. यानिमित्त मंदिराची रंगरंगोटी केली असून विद्युत रोषणाईने मंदिर व परिसर उजळून निघाला आहे.तरी समस्त जनतेनी यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन “तीर्थक्षेत्र भुडकेश्वर देवस्थान समितीच्या” वतीने करण्यात आले आहे.
विठ्ठल पालखी गणेश मंदिर बाबापूर येथून निघणार आहे अशी माहिती देवस्थान कमिटीने दिली .विठ्ठलाच्या पालखीचे कायर बसस्थानक येथून भुडकेश्वर देवस्थान इथे पोहोचणार आणि ह.भ.प. दिगांबर महाराज गाडगे (कळंब) यांचे भव्य कीर्तन तीर्थक्षेत्र कायर भुडकेश्वर देवस्थान येथे ठेवण्यात आले आहे.विशेषता “स्पर्श काळजाचा ” अश्या मनमोहक नाटक मात्र पावसाचा व्यत्ययाने पुढे ढकलण्यात आले आहे. याची नोंद घ्यावी.