अजय कंडेवार,Wani:- पावसाळा सुरु असल्यामुळे तसेच शनिवार, रविवार व रक्षाबंधन या तीन दिवसांचा सुट्टीने महसुल विभागाचे अधिकारी व तहसिलदार रेती तस्करीकडे स्पष्ट दुर्लक्ष केल्याने, याचाच फायदा वणी तालुक्यातील रेती तस्कर घेत असल्याचे सध्या दिसत आहेत.
वणी तालुक्यातील कायर जवळ येत असलेल्या “विदर्भा” नदिपात्रातून दररोज दिवसभर व रात्रभर ४ ते ५ ट्रॅक्टरद्वारे रेतीचा उपसा जोमात सुरू आहेत. हा उपसा मागील दोन दिवसापासुन सुरु असुन विदर्भा घाटातून दररोज शेकडो ब्रास रेतीची तस्करी होत आहे. शासनाच्या महसुलाला लाखो रुपयाचा चुना लागत आहेत ही बाब प्रशासनाला माहिती नसून एका व्हायरल व्हिडिओ व व्हायरल ऑडिओ क्लिप द्वारा माहिती मिळाली असुन या रेती तस्करांनी “अधिकारी मॅनेज “ झाल्याची खमंग चर्चा त्या तथाकथित “ऑडिओ” क्लिप मध्ये आढळली.याचा अर्थ असा की, प्रशासनानेच मुखसमंती दिली असावी आता गावातील नागरिकांमध्ये ओरड सुरू आहेत. रविवार व सोमवारी मोठ्या प्रमाणात रेती उपसा होणार असल्याची विश्वसनीय माहिती समोर आली आहे.
माहितीनुसार 4 ते 5 ट्रॅक्टर मालकांचा धंधा जोमात चालू असल्यानं जरा माजून असल्याचे चित्र दिसून येत आहे. “हमारा कोण क्या करेगा , हमारे साथ बडा नेता है असा भ्रम असेल तर अश्या मुजोर तस्करांना “विदर्भ न्युज ” आपली मालिका चालवून पर्दाफाश करण्यास आता सज्ज व्हावे लागणार आहे .कारण पडद्याआडचे नेते,भ्रष्ट अधिकाऱ्यांमूळे शासनाचा तिजोरीला लाखोंचा चुना लागत आहे याचां चोरांचे “पितळ उघडे “करायला वेळ लागणार नाही. याला कारणीभूत राजकीय हस्तक्षेप , गावराजकरण तर आहेच त्याचबरोबर महसूल प्रशासनातील काही झारीतील शुक्राचार्य व भ्रष्ट अधिकारी सुद्धा आहेत.या अवैधपणे होत असलेल्या या “तीन ” रेती तस्करांवर वरदहस्त कोणाचे असा प्रश्नही नागरिक करीत आहेत.यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन होणारी रेती तस्करी बंद करावी, ही मागणी जोर धरत आहेत.
टिप:- “अश्या कोणत्याही व्हायरल ऑडिओ क्लिप किंवा व्हिडिओ क्लिप विदर्भ न्यूज पोर्टल दुजोरा देत नाही आणि याबाबत पुष्टीही करत नाही “