विदर्भ न्यूज डेस्क,वणी : तालुक्यातील मानकी येथे 18 ऑगस्ट ला पार पडलेल्या ग्रामसभेत परशुराम सदाशिव पोटे यांची बिनविरोध सलग तिसऱ्यांदा तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
हि ग्रामसभा सरपंच कैलास पिपराडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.2016 पासून परशुराम पोटे हे मानकी ग्राम तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी आहेत. स्थानिक वाद-तंटे निपटारा करण्याचे कार्य उल्लेखनीय असून मनमिळाऊ स्वभाव व निर्णयातील सचोटी यामुळे त्यांची परत यावर्षी बिनविरोध निवड करत त्यांची सर्वानुमते सलग तिसऱ्यांदा अध्यक्षपदी वर्णी लागली. विशेष म्हणजे परशुराम पोटे यांनी गावातील इच्छुक प्रत्येकांना तंटामुक्त समितीच्या माध्यमातून कार्य करण्याची संधी मिळावी म्हणून आपल्या पदाचा नुकताच राजीनामा दिला होता.
या समिती मध्ये पदसिद्ध सदस्य म्हणून सरपंच कैलास पिपराडे, उपसरपंच शंकर माहुरे, सदस्य नानाजी पारखी, उमेश सावरकर, विठ्ठल सरवर, शंकर वासेकर, गुरुदेव चिडे, तर सचिव म्हणून पोलिस पाटील मिनाक्षी मिलमिले यांची तंमुस सदस्य पदी निवड करण्यात आली.