•गरजू कुटुंबांना फराळ,मिठाईचे वाटप.
अजय कंडेवार,वणी: – दिवाळी म्हणजे तिमिरातून तेजाकडे नेणारा सण. अंधारावर प्रकाशाच्या विजयाचं प्रतीक म्हणून देशभरात दिवाळी मोठ्या उत्साहानं साजरी केली जाते. समाजातील सर्व स्तरात दिवाळी हा मंगलमय, आनंददायी आणि मनामनात नवं चैतन्य निर्माण करणारा सण आप-आपल्या परीनं का होईना जल्लोषात साजरा केला जातो. मात्र, तो प्रत्येकाच्यांच वाट्याला येतो असं नाही. याच भावनेतून काँग्रेसचे डॉ. महेंद्र महेंद्र लोढा व यवतमाळ काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग उपाध्यक्ष अफसर शेख माणुसकीच दर्शन देत झरी तालुक्यांत गावाबाहेरील एका डोंररावर असलेले वडपोळ या गावात राहणाऱ्या वंचितांसोबत दिवाळी सण साजरा केली. पुरुष,महिला , वृध्द व लहान मूल अश्या 200 लोकांना मिठाई फराळ वितरित करून त्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आलें.
यावेळी काँग्रेसचे डॉ. महेंद्र महेंद्र लोढा व यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष अफसर शेख व कोंग्रेसचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.