•गोरगरीब दुर्बल जनतेसाठी नेहमीच ‘दुर्बल के बलराम’ ठरले डॉ. महेंद्र लोढा.
•असे व्यक्तीमत्व ज्यांनी स्वतःचे आयुष्य समाजाच्या उद्धारासाठीच…….
अजय कंडेवार,वणी:- काँग्रेसचे तडफदार सृजनशील विचारांचे, गतिशील कर्तृत्वाचे, कृतिशील नेते म्हणून डॉ.महेंद्र लोढा यांनी जनसामान्यांच्या मना-मनावर अधिराज्य गाजवले आहे. आरोग्याचे विघ्नहर्ता व कर्तव्यदक्ष म्हणून त्यांचे नावलौकिक खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. खरोखरच समाजामध्ये वावरत असताना असं म्हटलं जातं की, जो दुसऱ्यासाठी जगला तरच जगला, कारण स्वतःसाठी जगणारे समाजामध्ये अनेक नेते पाहिले, पण वणी शहरातील जनतेने असा एक नेता पहिला , जो नेता आपलं आयुष्य समाजाच्या उद्धारासाठी व त्यांचा आरोग्यासाठी गावी गावी जाऊन त्यांना एक संजीवनी देण्याचे मौलाचे कार्य देखील आज रोजी डॉ. महेंद्र लोढा करीत आहे.
डॉ.महेंद्र लोढा यांचा माध्यमातून वणी विधानसभा क्षेत्रात गोरगरीब जनतेच्या मदतीला कोरोनाकाळात केलेली मदत जसे कोव्हिड सेंटर असो की वेळोवेळी जनतेचा सेवेसाठी ‘भव्य आरोग्य शिबीर” भरवून जनतेची विनामूल्य केलेली आरोग्य सेवा असो. म्हणून खेडो पाडी डॉ.महेंद्र लोढा साहेब म्हणजे गोरगरीब दुर्बल जनतेसाठी नेहमीच ‘दुर्बल के बलराम’ ठरले आहेत.
राजकारण आणि समाजकारण यात विचारांना खूप प्राधान्य आहे. जिथं इतरांचे विचार संपतात तिथूनच डॉ. महेंद्र लोढा साहेबाचा कामांचे विचार सुरू होतात हेही तेव्हढच त्रिकालबाधित सत्य…..