Sunday, May 3, 2026
Homeवणीटोल वसुली बंद न केल्यास आंदोलन…

टोल वसुली बंद न केल्यास आंदोलन…

•बाळासाहेबांची शिवसेना आक्रमक

•उपविभागीय बांधकाम अभियंतेमार्फत पालकमंत्र्यांना साकडे.

अजय कंडेवार,वणी :- वणी व करंजी येथील टोल नाका वरील वसूली तत्काळ बंद करण्यात यावी याकरिता शहरातील बाळासाहेबांची शिवसेनेचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपविभागीय बांधकाम अभियंत्याना निवेदन देत यवतमाळ जिल्ह्यातील पालकमंत्री संजय राठोड यांना साकडे घालण्यात आले आहे.

घुग्घुस, वणी ते करंजी या राज्य महामार्गावर IVRCL या कंपनी मार्फत टोल वसुली सुरु आहे. या कंपनीने जनहिताचा सर्व बाबींकडे दुर्लक्ष केले आहे या कंपनीला पांढरकवडा येथील अभियंता यांनी तब्बल ६ वेळा कामात सुधारणा करण्यासाठी पत्र देऊन वेळ दिलेला होता. परंतु पाच वर्षांचा कार्यकाळ संपला तरी अजुनही कंपनीकडून रोडच्या बाजुला झाडे लावण्यात आलेले नाही.

दुभाजकाला कलर पट्टे तथा रेडियम पट्टे लावण्यात आलेले नाही रस्स्यावर आहे. रस्त्याचा जागो जागी खड्डे पडले. दुतर्फा काटेरी झुडूपे वाढलेली आहे. या सर्व बाबीमुळे अपघात होऊन जिवित हानी होत आहे .त्यामुळे या कामात सुधारणा IVRCL कंपनीचा व जनहिताच्या सुविधा उपलब्ध होतपर्यंत टोल वसुली बंद ठेवावी. याबाबत सात दिवसात कार्यवाही न केल्यास राज्यमहामागावर बाळासाहेबांची शिवसेना यांचा वतीने ‘रास्ता -रोको’ आंदोलन करण्यात येईल.

यावेळी निवेदन देतांना मनिष सुरावार, टिकाराम खाडे, सुधाकर गोरे, ललित लांजेवार ‘किशोर नांदेकर, राजु तुराणकर, देवेंद्र दोडावार, प्रेमनाथ ढवळे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page