Ajay Kandewar,Wani राजकारणाच्या रंगमंचावर नेहमीच घोषणांचा गजर होत असतो, पण या वेळेस आवाज घोषणांचा नाही तर शेतकऱ्यांच्या अश्रूंनी भिजलेल्या डफड्यांचा आहे. वणी तहसीलवर 23 सप्टेंबर रोजी शिवसेना उभाटा तर्फे होणारे “डफडे बजाव आंदोलन” हे केवळ आंदोलन नाही, तर सरकारला जागे करण्याचा निर्धार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाप्रमुख संजय निखाडे करीत असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सरकारला धडक इशारा दिला आहे.

यवतमाळ जिल्हा अतिवृष्टीने उद्ध्वस्त झाला आहे, शेतकऱ्यांचे हात रिकामे झाले आहेत, पेरणीची स्वप्ने वाहून गेली आहेत. तरीदेखील महायुती सरकार शांत आहे, जणू “झोपेचं सोंग घेतलं आहे”. हे मौन शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारे आहे.उबाठा मुख्य मागण्या :यवतमाळ जिल्ह्याला ओला दुष्काळ घोषित करणे,शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणे,पिकं नष्ट झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने अनुदान देणे
वणी तहसीलवर भगव्याची लाट उसळण्याची चिन्हे आधीपासून दिसत आहेत. गावागावातून निखाडेंच्या नेतृत्वात कार्यकर्ते जमणार असून, तहसीलवरून उठणारा आवाज हा केवळ वणीचाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचा असणार आहे.हे आंदोलन हे केवळ एक राजकीय पाऊल नाही, तर शेतकऱ्यांसाठी “उबाठा – आधाराचा आवाज” ठरणार आहे. संजय निखाडे यांच्या नेतृत्त्वात हे डफडे सरकारच्या दालनापर्यंत घुमले, तर झोपेचे सोंग घेणाऱ्या सत्ताधाऱ्यांना जागं न होणं कठीण आहे.
बॉक्स.
संजय निखाडे यांनी स्पष्ट शब्दांत सरकारला विदर्भ न्यूज या माध्यमाद्वारे सुनावले –
“शेतकरी हवालदिल झाले आहेत, कर्जाच्या ओझ्याखाली दबलं आहे, आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभं आहे; तरी सरकार गाढ झोपेत आहे. आता आम्ही डफडे वाजवून हा बहिरा झालेला कारभार जागा करणारच.

