Ajay kandewar,Wani : चांदा शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर द्वारा संचालित जनता विद्यालय वणी या ठिकाणी मार्गदर्शन व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या सत्कार सोहळ्यामध्ये मार्गदर्शक म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष अंबर जीवतोडे यांनी मार्गदर्शन केले मार्गदर्शन करत असताना त्यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी आणि मेहनत या विषयाच्या संदर्भात विद्यार्थ्यांना प्रेरणा व ऊर्जा प्राप्त करून दिली.
आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला मेहनत करावी लागेल आपल्या आई- वडिलांसोबत आपली सुद्धा मेहनत तेवढीच महत्त्वाची आहे. जो शिकत राहतो तोच मोठा होतो कारण शिक्षणच हे जीवन आहे असा मूलमंत्र चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अंबर जिवतोडे यांनी दिले. या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्षा मुख्याध्यापिका एम.डी. जोगी उपमुख्याध्यापिका नंदुरकर ,पर्यवेक्षक हांडे हे उपस्थित होते. कार्यक्रमानंतर चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अंबर जीवतोडे यांनी विद्यालयाच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपण करू कार्यक्रमाची सांगता केली. या कार्यक्रमाचे संचालन गजेंद्र काकडे व आभार कमलाकर देवाळकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी साठी जनता विद्यालय वणी येथील समस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले
.

