अजय कंडेवार,वणी:- जि.प.प्राथमिक शाळा, भुरकी येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती दि.12 जाने रोजी साजरी करण्यात आली.
प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सीमा बदकी(सरपंचा) ह्या उपस्थित होते तसेच शिक्षक स्वयंसेविका पूजा देऊळकर , मदतनीस सुषमा ठाकरे,चपराशी कैलास कोहळे हे सर्व उपस्थित होते, सरपंच यांच्या हस्ते शाळेतील मुलासाठी टाय व पट्टा बक्षीस दिले तसेच स्वामी विवेकानंद यांची माहिती डिजिटल दाखविण्यात आली हे विशेष…