▪️तालुक्याच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा
देव येवले, झरी :- जिल्हा परिषद शिक्षक कर्मचारी क्रीडा मंडळ यवतमाळ अंतर्गत पार पडलेल्या सांस्कृतिक महोत्सव २०२२ यामध्ये जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात झरी संघाने उमरखेड संघावर मात करीत विजेतेपदाचा मान मिळवला.
नंदुरकर शारीरिक शिक्षक महाविद्यालयाच्या पटांगणावर पार पडलेल्या झरी विरुद्ध उमरखेड असा अंतिम सामना खेळण्यात आला. हा सामाना अत्यंत रंगतदार झाला. या सामान्यमध्ये कर्णधार उमाकांत जामलीवार यांच्या नेतृत्वात झरी संघ मैदानात उतरला. यात अंतिम सामन्यात सामनावीर म्हणून झरी संघाचे गजानन धावर्तीवार ठरले. तर यष्ठीरक्षक नरेंद्र गायकवाड यांनी उत्कृठ कामगिरी पार पाडली. संपूर्ण स्पर्धेत मालिकावीर म्हणून गजानन धावर्तीवार यांनी बहुमान मिळवला. कर्णधार उमाकांत जामलीवार यांनी हँट्रिक्स घेत सामन्याला विजयीश्री खेचून आणला. त्यासोबतच चेतन सुरपाम यांनी काढलेल्या धावा अतिशय महत्वाचे होते डांगे व धावर्तीवार यांनी चौकार व षटकारानी संपूर्ण मैदान गाजवले. संघातील सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करून विजय मिळवून दिला. या विजयाने जिल्हा परिषद शिक्षक कर्मचारी क्रीडा मंडळ यवतमाळ अंतर्गत पार पडलेल्या जिल्हास्तरीय क्रिकेट 2022 स्पर्धेतील विजयाने झरी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
संघाचे मनोबल वाढविण्यासाठी पूर्णवेळ उपस्थित प्रविण शहारे सर, जगदीश आरमुरवार सर इतर सर्व सहकारी कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले. या विजयाने तालुकास्तरावर जिल्हा परिषद शिक्षक, कर्मचारी यांचे अभिनंदन होत आहे.