Ajay Kandewar,Wani:- तालुक्यातील निळापुर ब्राहनी शिवारात एका जिनिंगचा मागचा बाजूला दि.25 फेब्रु सायं.6 चा दरम्यान अज्ञात व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत सापडला असून तो शव हा मागील 4 ते 5 दिवसाचा असावा असा अंदाज बांधलेला आहे. सदर अनोळखी व्यक्ती पुरुष जातीचा वय अंदाजे 22 ते 25 वर्षे वयोगट, उंची अंदाजे पाच फुट ,चेहरा गोल घुमट असून काळ्या रंगाच्या केसाची दाढीमिशी आहे. रंग गोरा, बांधा सडपातळ असून पिवळ्या काळ्या रंगाचा शर्ट घातलेला होता. परंतू हा अर्धनग्न अवस्थेत त्या ठिकाणी का व कशासाठी आला ? अनुत्तरीतच आहे. अद्यापही ओळख पटली नाही. पुढील तपास वणी पोलिस करीत आहे.