Tuesday, February 17, 2026
Homeवणीचुणखडी खान प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध.....!

चुणखडी खान प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध…..!

अधिकाऱ्यांना आल्या पावली परत जावे लागले.

माणिक कांबळे /मारेगाव :- RCCPL कपंनीच्या वतीने डोंगरगाव येथे सुरु करण्यात येणाऱ्या चुणखडी खान प्रकल्पला वेगाव,परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवीला असून जन सुनावणीवर येथील नागरिकांनी बहिष्कार टाकून विरोधात ठराव पारित करण्यात आला आहे.Villagers’ opposition to Chunkhadi mine project.Officials had to retrace their steps.

तालुक्यातील डोंगरगाव येथे RCCPL या कपंनीच्या वतीने डोंगरगाव येथे चुणखडी खान प्रकल्प सुरु करण्याचे प्रस्तावित होते.या प्रकल्पामुळे पर्यवरणास काही धोका होईल का? या बाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबई द्वारा जनसुनावणी ठेवण्यात आली होती.ता 17जुलै वेगाव, डोंगरगाव,दहेगाव,या तीन गावात ठेवण्यात आलेल्या या सुनावणीसाठी सबंधित अधिकारी यांनी ग्रामसभेला उपस्थित होण्यासाठी विलंब केला होता त्यामुळे येथील नागरिकांनी प्राथमिक सुविधा अभावी या सभेवर बहिष्कार टाकून प्रस्तावाच्या विरोधात ठराव पारित करून आपला रोष व्यक्त केला आहे.

त्यामुळे अधिकाऱ्यांना आल्या पावली परत जावे लागले असून स्थानिक प्रशासन ग्रामसभेचा अहवाल शासनाकडे पाठवीणार आहे.या सुनावणीसाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे तहसीलदार निलावाड, ठाणेदार जनार्धन खंडेराव प्रामुख्याने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments