Ajay Kandewar,Wani :- दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी ग्रामपंचायत चिखलगाव येथे सत्ताधारी गटातीलच आठ निवडून आलेल्या सदस्यांनी एकत्रित राजीनामा दिल्याने ग्रामपंचायत राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. या घटनेनंतर सरपंच व उपसरपंच यांनी wtsup चा एका पत्राद्वारे खुलासा केल्याचे सांगितले असले, तरी हा खुलासा अधिकृत होता का? आणि खरंच पत्रकार अधिकृत परिषद घेण्यात आली का? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.सरपंच व उपसरपंच यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा करणार असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात कोणतीही अधिकृत पत्रकार परिषद झाल्याचे स्पष्टपणे समोर आलेले नाही.याऐवजी एक पत्र व्हॉट्सॲपद्वारे प्रसारित झाले. त्यामुळे हे पत्र ग्रामपंचायतीच्या अधिकृत प्रपत्रावर होते का? विशेषतः त्यावर शासकीय नोंदणी, क्रमांक किंवा ठरावाचा उल्लेख होता का? याबाबत पत्रकार आणि गावकऱ्यांमध्ये संभ्रम आहे.
त्या पत्रामध्ये हा सारा प्रकार “कुटील राजकारणातून व विरोधकांच्या डावातून” घडत असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र येथे एक मूलभूत प्रश्न उभा राहतो.जर राजीनामा देणारे आठही सदस्य हे याच सत्ताधारी गटातून निवडून आलेले असतील, तर विरोधकांचा डाव नेमका कुठे आहे? गावकऱ्यांमध्ये आणि राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, या आठ सदस्यांनी थेट विकासाच्या मुद्द्यावर आणि मनमानी कारभाराविरोधात राजीनामा दिला होता .विशेष म्हणजे, खुद्द राजीनामा दिलेल्या सदस्यांनीही “गाव विकास होत नसल्याने हा निर्णय घेतला होता” असे मत पत्रात केला देखील होता..अशा परिस्थितीत प्रश्न उपस्थित होतो की,जर सरपंच व उपसरपंच खरोखरच विकासकामे करत असतील,तर• ती विकासकामे कश्या दर्जाची?• कोणत्या निधीतून, कोणत्या ठरावाने आणि कोणत्या कालावधीत झाली?• आणि ती विकासकामे आठ सदस्यांना का दिसली नाहीत, पण उरलेल्या सदस्यांना मात्र कशी दिसत आहेत?
•मार्ग काढता आला असता….. पण
आठ सदस्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना चर्चेसाठी एकत्र बोलावून, बैठकीत प्रश्न मांडून, मार्ग काढता आला असता. मात्र तसे न करता थेट खुलाशाचे पत्र जाहीर होणे आणि त्यात विरोधकांवर बोट दाखवणे, ही बाबही अनेकांना विचार करायला लावत आहे.सध्या ग्रामपंचायत चिखलगावमध्ये “खरा डाव कोणाचा?”,“विकासाचा दावा आणि वास्तव यामध्ये अंतर आहे का?”आणि“हा सत्ताधाऱ्यांचा बचाव आहे की विरोधकांवर टाकलेले खापर?”असे प्रश्न चर्चेचा विषय बनले आहेत.एकीकडे सत्ताधारी गट विकासाचे दावे करत आहे, तर दुसरीकडे त्यांच्याच गटातील आठ सदस्य विकासअभावी राजीनामा देतात या विरोधाभासामुळे चिखलगावची ग्रामपंचायत सध्या ‘अळीमिळी गुपचिळी की उघड संघर्ष? या टप्प्यावर उभी आहे.या सर्व घडामोडींवर अधिकृत, स्पष्ट आणि पारदर्शक भूमिका कधी समोर येते, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.

