Ajay Kandewar :- पत्रकारिता ही समाजातील प्रश्नांना आवाज देणारी, सत्याला धार देणारी आणि सत्ताधाऱ्यांना आरसा दाखवणारी पवित्र व्यासपीठ मानली जाते. मात्र आज काही जणांनी या व्यासपीठाला चाटूकारितेच्या नाट्यमंचात परिवर्तित करून टाकले आहे.
कॉपी-पेस्टच्या जोरावर स्वतःला मुख्यसंपादक म्हणवून घेणारा एक चाटूगार आता पत्रकारितेच्या वाटेवर काटेरी तार ओढतोय. त्याचं काम पत्रकार घडवण्याचं नसून, पत्रकारितेची वाट लावण्याचं झालंय फोटोंचा शौक, पदाचा मोह आणि चापलुसीचा बाजार चाटूकारितेच्या हद्दी ओलांडून हा कॉपी-पेस्ट संपादक “५०० मधे एक मोठा पदाधिकारी” झाल्याचा डांगोरा पिटतोय. त्याला लागलेला फोटो सेशनचा क्रेझ इतका वाढला की खरी बातमी दुय्यम, तर पोझ देणं हेच प्रमुख ध्येय झालं आहे.
•मनात काही, तोंडात काही
मनात काही, तोंडात काही आणि मागून काड्या करून पोट भरणं – हीच त्याची खरी ओळख आहे. पत्रकारितेच्या पवित्रतेवर डाग लावणारी ही दुहेरी भूमिका आता उघड उघड दिसू लागली आहे.
• दोन ट्रॅक्टर रेती तस्करीसाठी सुरू असल्याची बोंब...
चाटूकाराच त्याचच पोट्टा गावातून ट्रॅक्टरने रेती चोरी करत असल्याची मोठी बोंब जनतेसमोर फुटली आहे. आणि घर त्याच चोरीचा भरवश्यावर चालते अस ही बोंब आहे.पत्रकारितेच्या नावाखाली चापलुसी करून पद, प्रतिष्ठा आणि पैसा मिळवणाऱ्यांची ही कारस्थाने लोकांच्या नजरेतून सुटलेली नाहीत.चाटूकारिता ही पत्रकारितेची नव्हे तर तिच्या अध:पतनाची निशाणी आहे. अशा कॉपी-पेस्ट संपादकांना काडीमाळ फासणं ही खरी पत्रकारितेची जबाबदारी आहे. सत्याला आवाज देणं, चुकीचं उघड करणं आणि ढोंगी मुखवट्यांचा पर्दाफाश करणं – हाच खरी पत्रकारितेचा धर्म आहे.आज गरज आहे ती खरीखुरी, निर्भीड आणि समाजाला दिशा देणाऱ्या पत्रकारितेची. चाटूकारितेच्या ढिगाऱ्यावर उभी राहून मिरवणाऱ्यांची खरी ओळख आता समाजाने ओळखली पाहिजे – कारण मुखवटे कितीही बदलले तरी चेहरा तोच राहतो.

