•सरपंचाचे निवेदने धूळ खात.
• वाहतूक ठप्प, शेतकऱ्यांना नाहक त्रास.
अजय कंडेवार, वणी –वणी येथून 6 किमी अंतरावर असलेल्या वडगाव या गावाजवळील झोला मार्गे नाल्यावरील पुल कोसळून पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून जनजीवन विस्कळीतही झाले आहे.त्यामुळें शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे मागिल 2 वर्षापासून वडगाव सरपंच अर्चना प्रमोद डाखरे व गावकरी जि. प. बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना निवेदाद्वारे पाठलाग करण्यात येत असला तरीही त्यांना लेखी वारंवार सूचनाही दिल्या तरीही सरपंचालाच उडवा उडविचे देत रवाना करीत असल्याचा घणाघाती आरोप सरपंच यांनी केला आहे.
वडगाव -झोला असा मार्ग असून या मार्गांवर असेलेले या नाल्यावरील पुल 2 वर्षांपासून नादुरुस्त आहे. या पुलाच्या दुरुस्तीबाबत जी.प.बांधकाम विभागाला सरपंच व गावाकऱ्यानी अनेकदा निवेदन दिलेले आहे. परंतु गावाकऱ्याच्या या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे अखेर हा पुल कोसळून पुरात वाहून गेला आहे. वडगाव- झोला हा सतत चालणारा वळदळीचा मार्ग असून बऱ्याच गावाचे प्रवासी या मार्गाने प्रवास करीत असतात. तसेच मोठ्या प्रमाणात शेतकरीवर्ग, विध्यार्थी करीता हा अत्यंत महत्वाचा मार्ग आहे. सध्या शेतीचे कामे सुरु असून शेतकऱ्यांना शेतीच्या कामा करिता याचं मार्गाचा वापर करावा लागतो,परंतु पुल कोसळल्यामुळे मार्ग पूर्णपणे बंद झाला असून नागरिकांना व शेतकऱ्यांना प्रचंड असा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच 2 वर्षापासून रहदारी बंद झाल्यामुळे शेतकऱ्याच्या शेती पिकाचे फार मोठे नुकसान होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि शेतीतून काढलेले पिक आणायचे कसे हा प्रश्न उपस्थित होत असतानाही या मागणीकडे जी. प. बांधकाम विभाग स्पष्ट कानडोळा करीत आहे.
त्यामुळे पुलाची त्वरित दुरुस्ती करून वाहतूक पूर्ववत करा अशी मागणी स्वतः वडगाव सरपंच व गावकरी यांनी केली असून पुलाचे काम त्वरित सुरु न केल्यास गावकऱ्यामार्फत जी.प.बांधकाम विभागाला घेराव करू असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.