Ajay Kandewar,Wani:- भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याला ठाकरे गटाच्या शिवसेनेने विरोध दर्शवला आहे. ठाकरे सेनेच्या महिलांकडून ‘माझं कुंकू माझा देश’ हे आंदोलन किरणताई देरकर व जिल्हा महिला प्रमुख योगिता मोहोड यांचा नेतृत्वात वणी येथील मुख्य चौकातील पूर्णांकित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर जमलेल्या हजारो संतप्त महिलांनी “पाकिस्तान मुर्दाबाद”यांच्या विरोधात अशा घोषणांनी परिसर दणाणले.या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींना १०२० कुंकवाच्या डब्या पाठवून महिलांनी निषेध व्यक्त केला.त्यानंतर महिलांनी क्रिकेट सामन्याचे प्रतीक म्हणून बॅट, बॉल आणि स्टम्प जाळून पाकिस्तानविरोधी निषेध नोंदवला.

कोट …..
पहलगाव येथील हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत क्रिकेटचा सामना खेळणे म्हणजे शहिदांचा अपमान आहे, असे किरणताई देरकर यांनी म्हटले आहे. देशाच्या सीमेवर जवान आपले प्राण गमावत असताना, पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणे हे राष्ट्रीय भावनांचा अनादर असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
यावेळी डिमनटोंगे, गीता उपरे,इंदु किन्हेकर, रूपाली कातकड़े ,सुरेखा ढेंगळे,सुरेखा भोयर, पौर्णिमा राजुरकर, सविता आवारी, सुनंदा गुहे, शारदा चिंतकुंतलवार,रेखा बोबड़े,अर्चना पिदुरकर,पौर्णिमा भोंगळे,जिजा वरारकर, अरुणा कूचनकार,अमीना पठाण, यमुना हिरादेवर,रजनी टोंगे, किर्ती देशकर, संध्या कोकास, प्रगती घोटेकर, शुभांगी ठाकरे,मनिषा टोंगे , विद्या कालेकर, मीनाक्षी मोहिते, माधुरी सुंकूरवार , रेश्मा कातरकर, शुभांगी टोंगे, प्रभाताई खाडे,शालिनी देरकर, मीनाक्षी गायकवाड,सुजाता ठाकरे,विशाखा चौधरी,भोयर,उषा सुर, भाग्यश्री जुनगरी, मनिषा बोबडे, सविता दोडके,व वणी विधान सभा क्षेत्रातील वणी-झरी-मारेगांव शिवसेना महिला आघाडीच्या समस्त महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

