•माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्यानी दिले सरपंच व ग्रामसेवकाला निवेदन
अजय कंडेवार,वणी – राजूर कॉलरी येथील माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रणिता अस्लम यांनी ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध असलेल्या निधीचा उपयोग गावाच्या विकासकामांसाठी करावा, अशा मागणीचे निवेदन सरपंच व ग्रामसेवक याना देण्यात आले आहे.
राजूर ग्रामपंचायतिला शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीचा उपयोग गावाच्या विकासकामांसाठी करण्यात यावा गावातील साई मंदिर वार्ड क्रमांक 2 मध्ये उर्वरित रस्त्याचे काम सुरू करावे, ग्रामपंचायतीच्या ट्रॅक्टर चा उपयोग कचरा उचलण्याकरिता न करता खाजगी ट्रॅक्टर चा वापर करून ग्रामपंचायत निधीची उधळण त्वरित थांबविण्यात यावी असाही आरोप ग्रा. पं. सदस्य यांनी निवेदनातून सांगितले आहे .
तसेच प्रधानमंत्री आवास योजनेची यादी प्रकाशित करून कार्यालयात लावण्यात यावी ,इजारा वॉर्ड क्रमांक 1 मधील फिल्टर प्लांट दुरुस्त करण्यात यावा , वॉर्ड क्रमांक 4 आणि 5 मधील घर उठविण्याच्या नोटिसमुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी विशेष ग्रामसभेची माहिती जनतेस देण्यात यावी याबाबतचे निवेदन माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रणिता अस्लम यांनी दिले.