•आज T -10 चॅम्पियन्स लीगचा उद्घाटनाला अलोट गर्दीची शक्यता.
•”पाटलांचा बैलगाडा…. तरूणांना थिरकविणार….
अजय कंडेवार,वणी:- गौतमीचा कार्यक्रम म्हणजे गर्दी, टाळ्या, शिट्ट्या, हुल्लडबाजी तर होणारच आहे पण शेवटी गौतमीचा ठुमके बघणे म्हणजे चाहत्यासाठी नशीबच.वणीतील चाहत्यांना “सबसे कातील…गौतमी पाटील” हिचा आज डान्स लाईव्ह बघायला मिळणार आहे.
ॲड.कुणाल चोरडिया यांच्या विशेष पुढाकाराने महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरात प्रथमच भव्यदिव्य चॅम्पियन्स लीगचे आयोजन प्रेमराज पारसमल ज्वेलर्स प्रस्तुत भव्य टी -10 क्रिकेट चॅम्पियन्स 29 डिसें. रोजी सायं.7 वाजता उद्घाटन वणी येथील शासकीय मैदानात गौतमी पाटीलचे बहारदार नृत्य कार्यक्रमाने होणार आहे. पाटलांचा बैलगाडा…. ठरणार तरुणाईकरीता आकर्षक यात माञ शंका नाही.तुफानी नृत्याने आणि सौंदर्याने गौतमी पाटीलने लोकांना अक्षरशः वेड लावलं आहे.’ ते आज वणीकरांना अनुभवयाला मिळणार आहे.