•नियमबाह्य काम बंद करण्याची मागणी
अजय कंडेवार,वणी :-तालुक्यातील वणी ते कोलारपिंप्री सार्वजनिक वाहतुकीचे डांबरी रस्त्यावर टँकरद्वारे पाणी मारण्याची निष्कृष्ट,बेकायदेशीर व जनतेच्या जीविताशी खेळ करणारे हे नियमबाह्य काम त्वरित बंद करून धूळ प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरण विभागाचा अटीनुसार वेगळी योग्य प्रतिबंधक उपाययोजना करण्यात यावी,याकरिता अल्टिमेट म्हणून कोलेरा (पिंपरी) येथील ग्रा.पं.सदस्य व गावकऱ्यांनी (ता.27.डिसें) रोजी मौजा ब्राम्हणी येथे स्थित असलेल्या गुप्ता कोलवॉशरीच्या व्यवस्थापकाला निवेदनाद्वारे साकडे घातले.Ultimatum to Gupta coalwashery, villagers angry.
वणी तालुक्यातील मौजा ब्राम्हणी येथे स्थित असलेल्या गुप्ता कोल वॉशरीव्दारा वणी ते कोलारपिंपरी सार्वजनीक वाहतुकीचा डांबरी रस्त्यावर निळापूर ते ब्राम्हणी या गावच्या दरम्यान अंदाजे 1 किमी अंतरात धूळ प्रदूषण रोखण्यासाठी टँकरद्वारे सतत पाणी शिंपडण्यात येते. या डांबरी रस्त्यावर सतत पाणीच-पाणी(चिखल) असते .यामुळे हा डांबरीरस्ता वेळेआधी खराब होऊन या रस्त्यावर मोठं मोठें खड्डे देखील पडले आहेत. कारण गुप्ता कोलवॉशरीचे कोळसा वाहतुकीमुळे रस्त्यावर उडणाऱ्या धुळीला प्रतिबंध करण्याकरीता सार्वजनिक डांबरी रस्त्यावर पाणी मारण्याचा बेकायदेशीर ,जनतेचा जीवाशी खेळ करणारा स्वस्त व सोपा मार्ग या कंपनीने निवडला आहे.या घातक टँकरने अतोनात पाणी मारल्यामुळे हा रस्ता सतत अतीओला व निसरडा होऊन ग्रामवासीयांचे दुचाकी घसरून पडताहेत.दररोज अपघातही होत आहेत. त्यामुळें आज रोजी गावकऱ्यांना मरणयातना सहन तसेच ये-जा करतांना तारेवरची कसरतही करावी लागत आहे. विशेषतः या नाहक चिखलातून मार्ग काढताना कित्येक वयोवृद्ध,महिला,शाळकरी विद्यार्थी व दुचाकीधारक गंभीर जखमी होऊन त्यांना अपंगत्व स्वीकारावे लागले .या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवजड ट्रकद्वारे सतत कोळसा वाहतूक केली जाते त्यामुळे दुचाकी घसरून चालक ट्रकखाली येऊन मोठी जीवितहानी होण्याची शक्यता माञ आता टाळता येणार नाहीं. परंतु असे झाल्यास या घटनेला सर्वस्वी जबाबदार गुप्ता कोलवॉशरी असेल यातही काही शंका नाहीच.
त्यामुळें मानवी घातक धूळ प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरण विभागाचे अटीनुसार रोड स्विपिंग मशीन व हवेतील कोळश्याची धूळ रोखणारी फॉग कॅनन मशीन सारखे पर्याय निवडावे व जनतेचे जगणे सुकर करावे. गावकऱ्यांची ही साधारण मागणी मान्य न झाल्यास सर्व ग्रापंचायत सरपंच,सदस्य व गावकरी लोकशाही मार्गाने आंदोलनाचा पवित्रा स्वीकारणार असल्याचे अल्टिमेटम् देण्यात आले सदर निवेदनाचा प्रती उपविभागीय अधिकारी तहसीलदार, उपअभियंता जि.प.सार्व बांधकाम विभाग,पोलीस निरीक्षक यांना पाठविण्यात आलें. यावेळी निवेदन देताना अतुल बोंडे, मोरेश्वर सातपुते,मोहन उताने, आनंद चौधरी, दिलिप सोनटक्के, आकाश डाहुले व अजय मडावी उपस्थित होते.Ultimatum to Gupta coalwashery, villagers angry.