•जय बजरंग बली पदावली भजन मंडळ तथा समस्त ग्रामवासी बाळापूर तर्फे भव्य पदावली भजन स्पर्धा संपन्न..
अजय कंडेवार,वणी : केंद्र शासन गाव चलो अभियान राबवित आहे. या अभियानांतर्गत गाव खेड्यातील ग्रामीण व शेवटच्या घटकापर्यंत केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना पोहोचविल्या जात आहे. या योजनांचा ग्रामीण जनतेने लाभ घ्यावा. गाव समृद्ध तर देश आपोआप समृध्द होईल, त्यासाठी गावाकडे चला असे विचार भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे यांनी मांडले.
निमित्त होते वणी विधानसभा अंतर्गत बाळापूर-बोपापुर येथे काल (दि.१६) रोजी आयोजित भव्य पदावली भजन स्पर्धेचे. जय बजरंग बली पदावली भजन मंडळ तथा समस्त ग्रामवासी बाळापूर तर्फे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पटांगण येथे सदर स्पर्धा पार पडली.
भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी सरपंच सौ. नंदिनी घुगल, प्रमुख अतिथी दिनकर पावडे, शामराव देवाळकर, शाम बोदकुलकर, रवी ढेंगळे, बंडू पिंपलकर, बुचे सर, विलासभाऊ नैताम, अरुण पिंपळकर, संजय देवाळकर, सतीश नाकले, सुरेश बरडे, साखरवार, बोरकुटे आदी प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले की, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यमुर्ती संत गाडगे महाराज यांनी जे विचार आपल्याला दिले आहे, त्या विचारावर जरी आपण चाललो तरी गावाचा विकास कुणी थांबवू शकत नाही. संत म्हणत होते की “आत्म उन्नती मे देशउन्नती”, त्यानुसार प्रत्येक व्यक्तीने स्वतःची उन्नती साधावी देशाची उन्नती आपोआप होईल.
यावेळी मोठ्या संख्येने परिसरातील गावोगावीचे नागरीक उपस्थित होते.