अजय कंडेवार ,Wani:- ‘गावचा सरपंच/उपसरपंच हा जर सुशिक्षित असेल व त्याला शासनाच्या योजनांबद्दल अचूक माहिती असेल, तर तो गावचा सर्वांगीण विकास करू शकतो,’अस एक जिवंत उदाहरण मोहदा या गावातील उपसरपंच सचिन रासेकर यांचाबाबतीत आहे. कारण मोहदा ग्रामपंचायतमध्ये एकमेव अस व्यक्तिमत्व.त्यात कोणतीही आशा न बाळगत निडर पद्धतीने काम करणारा नेहमी गावकऱ्यांचे प्रश्न असो, गावचा विकास असो, गावातील नागरिकांचे प्रश्न असो,शेतकऱ्यांचें प्रश्न असो नेहमीं तत्पर असणारा हाच खरा उपसरपंच सचिन रासेकर...
वनहक्क कायद्यानुसार पारंपरिक शेती करणाऱ्या व वननिवासी अतिक्रमणधारकांना मोहदा उपसरपंच सचिन रासेकार यांच्या पाठपुराव्यामुळे वनहक्क पट्टे शासनाच्या वतीने २५ शेतकऱ्यांना बहाल करण्यात आले परंतु शासनाच्या विविध योजनेचा लाभापासून अद्यापही वनहक्क पट्टेधारक शेतकरी वंचित होतें.याबाबत उपसरपंच यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी यांना निवेदनातून पाठपुरावा करीत मागणी करण्यात आली होती. अखेर त्या मागणीला यश मिळत शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना पिएम् किसान सन्मान निधी जमा झाले.
वणी तालुक्यातील ग्रा.पं मोहदा सरपंच वर्षा राजूरकर व उपसरपंच सचिन रासेकार यांच्या पाठपुराव्यामुळे २५ शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने वनहक्क पट्टे बहाल करण्यात आले होते.या शेतजमिनीवर अंशत: या शेतकऱ्यांना अधिकार प्राप्त झाला.परंतु या शेतकऱ्यांना अतिवृष्टी,अवर्षण, कीड व रोगामुळे झालेल्या हानीची नुकसानभरपाई मिळण्यास स्थानिकस्तरावर महसूल कर्मचाऱ्यांकडून अडचणी आणल्या जात होते तसेच शासनाच्या पंतप्रधान पिक विमा योजना, पी.एम. किसान सम्मान निधी योजना, नमो शेतकरी महासम्मान निधी योजना व २०२३ खरीप कापूस सोयाबीन अर्थसाहाय्य अनुदान योजना ह्या शेतकरी या नात्याने अक्षरशः अन्याय होत होते .कारण चंद्रपूर जिल्ह्यात वनहक्क पट्टेधारक शेतकऱ्यांना सर्व योजनेचा लाभ दिला जाते. मग यवतमाळमधील शेतकऱ्यांना लाभ का नाहीं असा स्पष्ट सवाल उपसरपंच सचिन रासेकर यांनी निवेदनात उपस्थित केला होता.या निवेदनाची शासनाने दखल घेत वनहक्क पट्टेधारक यांना अन्य योजनाचा न्याय मिळवून दिला. मोहदा गावात या निर्णयाने उत्साहाचे वातावरण आहे तसेच “उपसरपंच असावा तर असा…”असा सूर जनतेतून ऐकावयास मिळत आहे.