•सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे हेच एकमेव उद्दीष्ट
अजय कंडेवार,वणी:- विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ ग्रामपंचायत गणेशपुर येथे पंचायत समिती वणी च्या विद्यमाने 28 नोव्हें.2023 रोजी हा कार्यक्रम घेण्यात आला.सदर यात्रेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. ज्यांना आतापर्यंत शासकीय योजनांचा लाभ मिळाला नाही, अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्याच्या उद्देशाने प्रत्येक यंत्रणेने यात गांभिर्याने काम करावे,अशा सूचनाही भारत सरकारचे “जाईट सक्रेटरी” आनंदराव पाटील यांनी ग्रामपंचायत येथे भेट देत माहिती दिली. तत्पुर्वी गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार यांनी पुष्गुच्छ देत स्वागतही केलें.विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान आनंदराव पाटील यांनी भेटी दिल्या व गावक-यांशी संवादही साधला. या कार्यक्रमात आयुष्यमान भारत योजणेच्या पात्र लाभार्थ्यांना या प्रसंगी स्मार्टकार्ड वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी नितिन इंगोले, गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार, गटशिक्षण अधिकारी काटकर, नायब तहसीलदार कापसीकर, तालुका कृषी अधिकारी सुशांत माने, सहाय्यक गटविकास अधिकारी बी. एन. जाधव, ग्सचिव मिलिंद माने, गणेशपूर सरपंच आशा जुनगरी तथा सर्व ग्रामपंचायत सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. तालुका आरोग्य विभाग, कृषी विभाग, मरेगा विभाग, स्वच्छ भारत मिशन विभाग, शिक्षण विभाग तथा विविध शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारीही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रा.पः गणेशपूरचे सरपंच, सचिव , सदस्य व कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.