Tuesday, May 19, 2026
Homeचंद्रपूरगजानन ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक श्री. जयंत उमाकांत मामीडवार यांची यशोगाथा प्रेरणादायी.....

गजानन ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक श्री. जयंत उमाकांत मामीडवार यांची यशोगाथा प्रेरणादायी…..

Ajay Kandewar,Wani:- महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटचालीत रस्ते, पूल आणि राष्ट्रीय महामार्ग उभारणीमधून भक्कम योगदान देणारे नाव म्हणजे गजानन ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक श्री. जयंत उमाकांत मामीडवार. स्वतःच्या मेहनतीच्या बळावर, दूरदृष्टीच्या जोरावर आणि गुणवत्तेच्या ध्यासातून त्यांनी कन्स्ट्रक्शन क्षेत्रात उभारलेले साम्राज्य आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.

सन 1958 मध्ये एका सामान्य सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरच्या रूपाने त्यांनी गजानन ग्रुप ऑफ कंपनीची स्थापना केली. छोट्याशा सुरुवातीपासून सुरू झालेला हा प्रवास आज महाराष्ट्रातील सर्वात विश्वासार्ह आणि अव्वल दर्जाच्या कन्स्ट्रक्शन कंपन्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. पूल बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग उभारणी, दर्जेदार काँक्रीट निर्मिती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये गजानन ग्रुपने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

“कामामध्ये गुणवत्ता आणि वेळेत पूर्णता” हे ब्रीद कायम जपत श्री. जयंत मामीडवार यांनी RMC प्लांटची सुरुवात करून बांधकाम क्षेत्रात आधुनिकतेचा नवा आदर्श निर्माण केला. त्यांच्या नेतृत्वाखाली उभे राहिलेले अनेक प्रकल्प आज विकासाचे प्रतीक मानले जातात. महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीत त्यांनी दिलेले योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते.

विशेष म्हणजे, हजारो कुटुंबांच्या आयुष्यात रोजगाराची नवी पहाट आणण्याचे कार्यही त्यांनी केले आहे. गजानन ग्रुप ऑफ कंपनीच्या माध्यमातून तब्बल 5000 पेक्षा अधिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देत त्यांनी केवळ उद्योगच उभारला नाही, तर अनेकांच्या संसारालाही आधार दिला आहे. त्यामुळेच कन्स्ट्रक्शन क्षेत्रात “रोजगार निर्माण करणारा सर्वात मोठा कॉन्ट्रॅक्टर” म्हणून त्यांचे नाव अभिमानाने घेतले जाते.त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत प्रतिष्ठेचा “लोकमत ग्लोबल एक्सिलेन्स अवॉर्ड” देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता .हा पुरस्कार केवळ त्यांच्या यशाचा सन्मान नसून, प्रामाणिकपणा, मेहनत आणि दूरदृष्टीच्या जोरावर उभ्या राहिलेल्या एका महान व्यक्तिमत्त्वाचा सन्मान मानला जातो.आज श्री. जयंत उमाकांत मामीडवार हे नाव केवळ उद्योगविश्वापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ते विश्वास, गुणवत्ता आणि विकासाचे प्रतीक बनले आहे. संघर्षातून उभा राहिलेला हा विकासपुरुष आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आदर्श ठरत असून, “मेहनत, प्रामाणिकपणा आणि दूरदृष्टी असेल तर यश नक्की मिळते,” याचे जिवंत उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवार, समर्थक, नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, “असाच जनतेसाठी कार्यरत राहा,” अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.“जनसामान्यांचा माणूस” अशी ओळख निर्माण करणाऱ्या जयंत मामिडवार यांना वाढदिवसानिमित्त निरोगी, दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या हातून समाजसेवेचे कार्य अधिक बळकट होवो, अशा शुभेच्छा सर्व स्तरातून दिल्या जात आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page