•P.I अजित जाधवांचा अवैद्य धंद्यावाल्यांना धाक…
•7 गुन्हे 17 आरोपी 3 लाखांचावर मुद्देमाल जप्त.
अजय कंडेवार,वणी :– मागील 2 दिवसांपासून जुगार अड्ड्यांवर छापासत्र सुरू आहे. मात्र, अशा छाप्यांवेळी जप्त केलेल्या रकमेच्या हिशेबाचा अहवाल तयार करताना पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. त्यामुळे खेळ जुगाऱ्यांचा व काम पोलिसांना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.Games for gamblers, work for the police.•P.I.Ajit Jadhav’s threat to jugaris.
वरिष्ठ पोलीस अधिकारी व गणेश किंद्रे उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांचे मार्गदर्शनात वणी ठाणेदार P.I अजित जाधव यांच्या आदेशानुसार वणी पोलिसांनी जुगार खेळणाऱ्यांवर धाडसत्र सुरू केले आहे.मागील दोन दिवसांपासून पोलीसांचे वतीने शहरातील एकता नगर कॉम्प्लेक्स,एकता नगर, नगर परीषदले सिटी पोईन्ट , गंगाविहार कॉलनी येथील बंद खोलीत जुगार अड्यावर पोलीसांनी धाडी मारुन एकूण 7 गुन्हयातील 17 आरोपीविरुध्द जुगार कायद्याअंतर्गत कार्यवाही करुन एकूण 3 लाख 32हजार 870 रुपये मुद्देमाल जप्त केला आहे.
वणी येथील गंगा विहारात कारवाई मोठ्या स्वरूपाची होती. परंतु, अशा कारवाईमध्ये जप्त केलेला मुद्देमाल व रोख रक्कम यांच्या हिशेबाचा अहवाल तयार करण्यासाठी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा अधिक वेळ वाया जात असल्याने अतिरिक्त कामाचा बोजा पडत आहे. त्यातच ताब्यात घेतलेल्या जुगाऱ्यांना नियमानुसार कारवाई करत लगेचच जामीन होत असल्याने जुगारी पुन्हा जुगार खेळण्यासाठी तयार होतात. त्यामुळे जुगार अड्ड्यावर छापा टाकल्यानंतर पुन्हा त्याच जागेवर जुगार खेळण्याचे प्रकार सुरू होतात. त्यामुळे शासनाने कडक नियमावली बनवून जुगार खेळणाऱ्यांचा कायस्वरूपी बंदोबस्त कसा होईल, याबाबत विचार केला पाहिजे. ज्या जागेवर जुगार खेळला जात असेल त्या जागामालकाला मोठ्या शिक्षेची तरतूद केल्यास नक्कीच जुगार अड्ड्यांवर आळा बसेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.