•विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, पत्रकार सेवा संघ व कला महाविद्यालयाचे आवाहन
नागेश रायपूरे, मारेगाव:- विदर्भातील अस्सल गावरान शैलीत व्याख्यानातून रंजक ज्ञानार्जन करणारे अवघ्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध खदखद मास्तर नितेश कराळे सर आज दि.२५ डिसेंबर रोज रविवारला सकाळी ११ वाजता येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथे येत आहे. या कार्यक्रमात स्पर्धा परीक्षा व बेरोजगारी या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार सेवा संघ व कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव च्या संयुक्त विधमाने करण्यात आले आहे.
स्थानिक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातच्या खुल्या पटांगणात होणाऱ्या प्रा.कराळे सर यांच्या ज्वाला मुखीतून लाव्हा रस कसा खदखद बाहेर पडतोय.आपल्या मनोरंजनात्मक सहज आणि सोप्या भाषेतून समाज माध्यमातून ज्ञानार्जन करणारे शैक्षणिक तरुणाईत गळ्यातील ताईत बनलेले कराळे सर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व आर्थिक परिस्थिती सह व्यवस्थेवर प्रहार करणार आहे.अलीकडच्या स्पर्धा परीक्षा , बेरोजगारी , विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर पोहचविण्यासाठी आपल्या अभिनव शैलीतून मार्गदर्शन करण्यासाठी खदखद मास्तर आज मारेगावात येत आहे.
या कार्यक्रमात रंगनाथ स्वामी पतसंस्थाचे अध्यक्ष अँड.देविदासजी काळे , लोढा मल्टीस्पेशालिटीचे संचालक , आदिवासी समाज पुरस्कार प्राप्त डॉ.महेंद्र लोढा हे स्वागताध्यक्ष असणार आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.अविनाश घरडे राहणार आहे.तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष केशवजी सवळकर , जिल्हाध्यक्ष अनिल राठोड , सामाजिक कार्यकर्ते विजय बोथले , अविनाशजी लांबट हे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. परिसरातील तमाम विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मारेगाव तालुका प्रेस संपादक व प्रेस सेवा संघ तथा कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव च्या वतीने करण्यात आले आहे.