Sunday, May 3, 2026
Homeवणीक्रां.सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त राजुर येथे विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम.......

क्रां.सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त राजुर येथे विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम…….

अजय कंडेवार, वणी : क्रां.सावित्रीबाई फुले जयंती निमित्त राजूर नगरी मध्ये 3 ते 5 जानेवारी 2023 ला 3 दिवसीय भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन महिला समारोह समिती व बहुजन स्टुडंट्स फेडरेशन राजूर तर्फे करण्यात आले आहे.दिनांक 25 डिसेंबर 2022 ला सामान्य ज्ञान परीक्षा स्पर्धा घेण्यात आली.

दिनांक 3 जानेवारी 2023 ला सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थान,मेघे सावंगी चे सर्व रोग निदान व उपचार आरोग्य शिबिर, तसेच सकाळी 10 वाजता शालेय चमू सह भव्य आकर्षक मिरवणूक ,नंतर लगेच 11 वाजता मा. उद्घाटक आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार आणि प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रम संपन्न होईल. सायंकाळी 6 वाजता अंध मुलांचा ऑर्केस्ट्रा चेतन सेवांकुर आणि संच सादर करतील.
दिनांक 4 जानेवारी 2023 ला सायंकाळी 6 वाजता भव्य नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेत नाव नोंदविण्यासाठी 8657412389 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
दिनांक 5 जानेवारी 2023 ला सायंकाळी 6 वाजता प्रबोधनकार सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचा जाहीर समाज प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या 3 दिवसीय कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक समिती तर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page