Tuesday, May 13, 2025
Homeवणीक्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा आम्हाला अभिमान- श्रीमती शोभना (मुख्याध्यापिका)

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा आम्हाला अभिमान- श्रीमती शोभना (मुख्याध्यापिका)

•मॅकरून सीबीएसई शाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी

अजय कंडेवार,वणी:- मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी सीबीएसई या शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी शाळेचे मुख्याध्यापिका श्रीमती शोभना यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी वर्ग 2 री तील वर्गशिक्षक सुनिल तिखट यांचा वर्गातील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करीत अत्यंत उत्साहपूर्वक वातावरणात साजरा केला.

आम्ही सावित्रीच्या लेकी आपला हक्क मिळविण्यासाठी सतत संघर्ष करत राहू ही शिकवण क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी आम्हाला दिलेली आहे, आणि आम्ही त्यांची शिकवणूक कधीही विसरणार नाही. आम्ही आमच्या हक्कासाठी सतत संघर्ष करत राहू.सावित्रीबाईनी स्त्रियांना जी शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे त्या संधीचे आपण सोने करावे. स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे कर्तुत्वान सावित्रीबाई फुलेंचा आम्हाला अभिमान असायला पाहिजे ” असे शाळेचे मुख्याध्यापिका श्रीमती शोभना यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थांना सांगितले.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेतील मुलींना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सावित्रीच्या लेकी म्हणून सन्मान करण्यात आला. तसेच क्रा. सावित्रीबाई फुले या वेशभूषेत अपूर्वा तीमांडे (वर्ग २ रा), काव्य चहानकर हिने दिनविशेष सांगितले तर ठळक बातम्या मोनल राजूरकर (वर्ग २ रा),व सुविचार सानवी खोब्रागडे (वर्ग २ रा), सांगीतले.यावेळी सर्व शिक्षकांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गुणगौरव केला. या वेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments