Tuesday, February 17, 2026
Homeवणीकॉपी-पेस्ट स्वंयघोषित पत्रकारांचा सुळसुळाट .....!

कॉपी-पेस्ट स्वंयघोषित पत्रकारांचा सुळसुळाट …..!

अजय कंडेवार :पत्रकारितेच्या पवित्र क्षेत्रात आजकाल कॉपी-पेस्ट पत्रकारांचा सुळसुळाट झाल्याची चर्चा जोरात आहे. मोबाईलवर मिळालेली माहिती, कुणी काड्या करायसाठी दिलेली प्रेस नोट,फेसबुक-व्हॉट्सअ‍ॅपवरील पोस्ट थेट कॉपी करून बातमीच्या नावाखाली लोकांपर्यंत पोहोचवली जाते. ना पडताळणी, ना तथ्य तपासणी – सरळ कॉपी आणि पेस्ट!

याहूनही गंभीर बाब म्हणजे हे काही जण तर निव्वळ हजार-पाचशे रुपयांत कोणाचीही बदनामी करण्याचा डाव आखत असल्याचे समोर येत आहे. सायंकाळचा सोय साठी पैसा दिला की व्यक्ती बातम्या छापल्या जातात असाही आव दिसत आहे.समाजात अशा खोट्या बातम्यांमुळे एकीकडे लोकांची दिशाभूल होत असताना, दुसरीकडे खरी पत्रकारिता गाळात जात आहे. सध्या तर वाटेल तो कॉपी पेस्ट करून मी पत्रकार म्हणून झुंगारू लागला.

“पत्रकारिता म्हणजे समाजाचा आरसा” ही ओळ आज फक्त भाषणापुरती राहिली आहे. प्रामाणिक पत्रकार मेहनत घेऊन खरी माहिती जनतेपर्यंत पोहोचवतात, पण दुसरीकडे पैशाच्या जोरावर चालणारा हा कॉपी-पेस्ट व्यवसाय लोकांचा विश्वास डळमळीत करत आहे.या भाडोत्री पत्रकारितेला आळा कोण घालणार? पत्रकार संघटना या गंभीर प्रकाराकडे डोळेझाक का करत आहेत?आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, लोकांनी अशा पेड बातम्यांच्या जाळ्यातून स्वतःला वाचवायचं कसं?आज खरी वेळ आहे खरीखुरी पत्रकारिता वाचवण्याची. अन्यथा उद्या ‘बातमी’ ही सत्य नसून फक्त पैशांनी विकत घेतलेली अफवा ठरेल!

•त्या भामट्या पत्रकारांमुळे सुशिक्षित व जबाबदार पत्रकार भरडल्या जातय…..

“मागील दोन महिन्यात वणी तालुक्यात दोन तथाकथित पत्रकारांवर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यात एका तथाकथित पत्रकारावर खंडणी गुन्हा दाखल झाला तसेच पुन्हा एका स्वंयघोषित पत्रकाराने एक शेतकऱ्याला ५० हजारासाठी आत्महत्येस प्रवृत करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. अश्या प्रकाराने सुशिक्षित व जबाबदार पत्रकार भरडल्या जातय.यात  आणखी एक मुख्य कारण हे कॉपी पेस्ट बहाद्दर दे …प्रेस नोट लावतो आणि जस तुम्ही दिली तशी त्याला टोचतो असे म्हणणाऱ्या स्वंयघोषित पत्रकारांमुळेच….

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments