अजय कंडेवार,वणी- माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची 39 वी पुण्यतिथी आहे (Indira Gandhi Death Anniversary). 31 ऑक्टोबर 1984 ला त्यांच्याच अंगरक्षकांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. इंदिरा गांधी यांनी आपल्या कार्यकाळात अनेक कणखर निर्णय घेतले होते. त्यावर वेळोवेळी टीकाही झाली पण त्या आपल्या निर्णयांवर ठाम राहिल्या त्यामुळे त्यांना ‘आयर्न लेडी’ म्हणूनही ओळखलं जातं त्यांचा पुण्यतिथीनिमित्त वणी शहर व सेवादल काँग्रेस कमिटी तर्फे ता.31 ऑक्टो.रोजी स्व.इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले.Congress Committee’s greetings to Late Indira Gandhi on her Death Anniversary.
भारताची पंतप्रधान प्रथम महिला प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांनी देशाची धुरा सांभाळली व धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सक्षम असल्याने त्यांना आर्यन लेडी म्हणून उपाधी देण्यात आली.
या कार्यक्रमाला उपस्थित माजी आमदार वामनराव कासावार ,अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष अफसर शेख , तालुका अध्यक्ष घनश्याम पावडे, प्रमोद वासेकर ,प्रमोद लोणारे, प्रमोद निकुरे, वामन कुचणकर,काजल अखतर शेख,सुरेश बन्सोड,रवी कोटावार, महादेव दोडके इत्यादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.