•शिरपूर पोलिसांची कामगिरी,45 हजार रु. मुद्देमाल जप्त.
अजय कंडेवार,वणी: तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेले वेकोली नायगाव खदानमधून इलेक्ट्रिक केबल चोरीला गेल्याची रात्री 11 वाजता दि.22 ऑगस्ट रोजी शिरपूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपी विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आले होते. रिपोर्ट दाखल होताच अवघ्या 12 तासाचा आत केबल चोरीचा छडा लावण्यात शिरपूर पोलिसांना यश आले असून, या प्रकरणी अमोल हिरामण रामटेके (वय 38 वर्ष), रा.हनुमान नगर,म्हातारदेवी , जिल्हा,चंद्रपूर त्याच्याकडून चोरी केलेल्या केबलही पोलिसांनी जप्त केले आहेत हे विशेष.
वेकोली नायगाव खदान मधून वीस हजार रुपये किमतीचे इलेक्ट्रिक केबल चोरीला गेले होते. तर शिरपूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपी विरुद्ध दि 22 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजता चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. शिरपूर ठाणेदार यांनी तपासचक्रे फिरवीत सदर गुन्ह्यात आरोपी अमोल हिरामण रामटेके (वय 38 वर्ष)रा. हनुमान नगर , म्हातारदेवी, जिल्हा चंद्रपूर हा आरोपी निष्पन्न झाल्याने त्या आरोपीस अटक करून चोरीचा गुन्ह्यात चोरीचा केबल अंदाजे 20हजार, वापर करण्यात आलेली मोटर सायकल किंमत 25 हजार रु. असा एकूण 45 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही विशेष मोहीम अवघ्या 12 तासाचा आतच गुंडाळली.
सदरची कामगिरी गणेश किद्रे(उ. पो.अ, वणी) व मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन करेवाड,सुनील दुबे,निलेश भुसे,गजानन सावसाकडे व विजय फुलके यांनी केली आहे.