•शहर कृती समितीच्या पाठपुराव्याला यश.
प्रकाश खिल्लारे,पुसद :- येथील बऱ्याच वर्षापासून नरसिंह स्कूल मंजूर व्हावे म्हणून पुसद शहर कृती समितीच्या वतीने पाठपुरावा केल्या जात होता. या मागणीला यश आले असून ८० मुलींना प्रशिक्षणाची सुविधा असलेली अत्याधुनिक वस्तीगृहासह हे स्कूल लवकरच इमारतीच्या बांधकामाला प्रारंभ होऊन मुलींना प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध होत आहे .यासाठी कृती समितीचे अध्यक्ष अशोक बाबर पंजाबराव देशमुख, खडकेकर, संजय ठाकरे ,अशोकराव राऊत यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाठपुरावा करून हे नर्सिंग स्कूल मंजूर करून घेतले आहे.
यामुळे माहूर किनवट हादगाव उमरखेड आणि सिंग दिग्रस दारवा आणि आर्मी व पुसद महागाव तालुक्यातील विद्यार्थ्यांना या संधीचा फायदा होणार आहे. हे नर्सिंग स्कूल पाटबंधारे विभागाच्या वाशिम रोडवरील जागेवर उभारल्या जाण्याची शक्यता असल्याचे बोलल्या जात आहे. शहराच्या विकासात या नर्सिंग स्कूलमुळे भर पडणार आहे हे मात्र खरे.